तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी 26 मे रोजी एकदिवशीय शिबीर

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तीसाठी https:transgender.dosje.gov.in राष्ट्रीय पोर्टल सुरु केले आहे. मात्र त्यांना अर्ज करता येत नाहीत, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी 26 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता एकदिवशीय शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांना अर्ज करता येत नसल्याने स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली आहे. तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींचे प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
इतर ठिकाणीही तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांच्या सहाय्याने एकदिवशीय शिबीराचे आयोजन करावे. एकदिवशीय शिबीरास येताना तृतीयपंथीय व्यक्तींनी येताना आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, कलर फोटो, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र सोबत घेऊन यावे.
शिबीरात तृतीयपंथीय व्यक्ती व स्वयंसेवी संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था/ संघटना यांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन आढे यांनी केले आहे.
0 Comments