बाळासाहेबांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 13, 2022

बाळासाहेबांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

बाळासाहेबांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

           मुंबई, (नचिकेत पानसरे):- प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून संजीवनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages