'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा'...
देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत 20 मे रोजी टेंभुर्णी येथे अभियानाची सांगता...
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): रयत क्रांती संघटनेच्या "जागर शेतक-यांचा आक्रोश महाराष्ट्राचा" या राज्यव्यापी अभियानाचा समारोप शुक्रवार दिनांक 20 मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस सदाभाऊ खोत यांचेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर सभेने समारोप होणार आहे अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी माढा तालुका भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
सविस्तर माहिती देताना प्राध्यापक पाटील म्हणाले की दिनांक २९ एप्रिल २०२२ पासुन रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार गोपिचंद पडळकर व इतर मान्यवरांचे बरोबर , "जागर शेतक-यांचा आक्रोश महाराष्ट्राचा " या नावाने सुरु असलेल्या राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ कोकणापासुन सुरु होऊन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा संपन्न झाला असुन, या अभियानाची सांगता सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे शुक्रवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर सभेने होणार आहे .
यावेळी अभियाना संबंधी विशेष माहिती देताना प्रा. सुहास पाटिल म्हणाले की मविआ सरकारला अडिच वर्षे होत आली पण सरकार लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यात अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप- प्रत्यारोप व कारवाई तसेच भष्टाचार, रयतेच्यता समस्या, वीज वसुली ,लोड शेडींग अतिरीक्त ऊस, शेतकरी आत्महत्या् ,शैक्षणीक समस्या, रखडलेली नोकर भरती ,ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण मिळवुन देण्यात वेळकाढुपणा बोकाळलेला आहे. , कोरोनातील अपयश, अतीवृष्टी, वादळ, दुष्काळ,रासायनिक खत टंचाई , पेट्रोल डिझेल दरवाढ पिकवीमा या समस्या सोडवण्यात म.वि.आ सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्रातील अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जागर शेतक-याचा आक्रोश महाराष्ट्राचा या राज्यव्यापी अभियानाने संपुर्ण राज्य ढवळुन निघालेले आहे .
टेंभुर्णी तालुका माढा येथे होणाऱ्या या अभियानाच्या सांगता समारोपासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांचेसह खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी मंत्री हर्षवर्धन पाटिल, आ. प्रशांत परिचारक आ. रणजीतसिंह मोहीते – पाटिल आ. सचिन कल्याण शेट्टी आ. राजाभाऊ राऊत आ.समाधान आवताडे आ. राम सातपुते. आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक विठ्ठल मस्के, रयत युवा आघाडी तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड, भाजपा माढा तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे,भाजपा शहराध्यक्ष नागनाथ वाघे, आरपीआय जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष निवृत्ती तांबवे,रयत, अमर पवार, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, जिल्हा संघटक बळीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments