मात्र ठरल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात शिक्षण विभागाला अपयश
.jpg)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र ठरल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात शिक्षण विभागाला अपयश आले आहे. शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे, त्याशिवाय आता माघार नाही. असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष म. ज. मोरे यांनी दिला आहे.प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवार २५ मे पासून चक्री उपोषणास संघटनेचे जिल्हाध्यक्ष म.ज. मोरे, सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, कार्याध्यक्ष ज्योतिराम बोंगे,कार्याध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली.समुपदेशन घेतलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि उर्दू व कन्नड मुख्याध्यापकांचे आदेश नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावेत, समाजशास्त्र नकार व विज्ञान विषय शिक्षकांच्या नियुक्तया तात्काळ करण्यात याव्यात, केंद्रप्रमुख मुख्याध्यापकाचे पदोन्नती तात्काळ करावी, डी सी पी एस धारक शिक्षकांच्या कपातीचा हिशोब तात्काळ देण्यात यावा या व अन्य मागण्यासाठी हे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
0 Comments