टेंभुर्णी येथे प्रवाशी महिलेची चार लाखाचे सोने असलेली बॅग पळवली

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): टेंभुर्णी येथे सोलापूर-पुणे महामार्ग वरती असणाऱ्या हॉटेल शितल च्या समोरून नाशिक येथील प्रवाशी महीलेची ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून प्रवासी महिला पंचशीला धोंडोपंत गवळी यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिकची माहिती अशी कि पंचशीला धोंडोपंत गवळी (वय ३६ रा.औरंगाबाद रोड नाशिक) या एम एच १५ एच एच ५११५ या बसमधून प्रवास करत होत्या. सोमवारी रात्री ११ चे सुमारास सदर बस सोलापूर-पुणे महामार्ग वरील हॉटेल शितल समोर उभी असताना. प्रवासी ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी बॅग ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत चोरून नेली. सदर बॅग मध्ये ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या २ बांगड्या, २ तोळे वजनाचे ५-५ ग्रॅमच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, २ तोळे वजनाची सोन्याची चैन, १ तोळे वजनाची कानातील कर्णपुफे व झुबे असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद सदर प्रवासी महिलेने टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोसई ओमासे
0 Comments