Hot Posts

6/recent/ticker-posts

68 लाख रुपयांचा गुळ प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो म्हणून ४१ लाखाची फसवणूक सय्यद वरवडे येथील प्रकार

68 लाख रुपयांचा गुळ प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो म्हणून ४१ लाखाची फसवणूक सय्यद वरवडे येथील प्रकार

            मोहोळ (कटुसत्य वृत्त): ५० टन प्रति दिनी क्षमतेचा गुळ कारखाना प्रकल्प सुरू करून देतो असे म्हणतात मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील एका शेतकरी उद्योजक दाम्पत्याची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिसात दाखल झाल्याने पूर्णा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. किशोर व्यंकटराव साठे रा. श्रीनगर कॉलनी बिदर रोड उदगीर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर वनीता बापूजी व्हटकर रा.रवी पार्क जगताप चौक परमार पार्क जवळ वानवडी पुणे मात्र  मुळगाव सय्यद वरवडे ता.मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी याप्रकरणी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

            याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वनिता बापूजी व्हटकर आणि त्यांचे पती बापूजी चांगदेव व्हटकर यांनी मोहोळ विजापूर महामार्गावरील सय्यद वरवडे शिवारात महामार्गालगत असलेल्या शेतामध्ये 50 टन क्षमतेचा गुळ उत्पादन करणारा सत्यदेव ऍग्रो पार्क या नावाने गुळ कारखाना प्रकल्पाची उभारणीची योजना तयार केली होती. या नियोजित प्रकल्पासाठी यंत्रसामुग्री आणि इतर तांत्रिक साधनसामग्री मिळण्यासाठी किशोर वेंकटराव साठे यांच्या साई सोलर सिस्टिम कंपनीकडून तब्बल ६८ लाख रुपयांचे कोटेशन घेतले नंतर किशोर साठे आणि त्यांच्या टीमने फिर्यादीच्या शेतात येऊन प्लांट उभा करायचा आहे ती जागा पाहून पाच हजार रुपये टोकन अमाऊंट घेतली त्यानंतर ६०  टक्के रक्कम भरल्यानंतर ४५ दिवसात प्रकल्प उभा करून देतो असे आश्वासन साठे यांनी दिले त्यानंतर फिर्यादीने जनसेवा बँकेतून नऊ लाख रुपये तसेच त्यांच्या स्वतःच्या खात्यातून सिस्टीम कंपनीच्या नावावर पंधरा लाख रुपये तसेच इतर वेळोवेळी एकूण रक्कम  कॉसमॉस बँकेतून जवळपास 40 लाख रुपयांचा डीडी काढून किशोर साठे यांच्या नावावर जमा केला असे एकूण 64 लाख रुपये देऊन ही प्रोजेक्ट सुरू करण्याबाबत आज ना उद्या उभा करु असे म्हणत चालढकल केली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला  असता १९ लाख ४० हजार रक्कम त्यांनी परत दिली. मात्र एकूण ४१ लाख ५२ हजार रुपये रक्कम परत न देता त्यांना केवळ चार लाख रुपये किमतीचा जुना ड्रायर मशीन आणून दिले ज्यामधून गुळ उत्पादन निघू शकत नसल्याचे त्यांना जाणवल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोहोळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून सविस्तर फिर्याद दिली असून या प्रकरणी किशोर व्यंकटराव साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक खारगे करत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments