Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्या 4 मे रोजी भोंग्यांचे संरक्षण ; 10 मे रोजी राज्यभर आंदोलन

उद्या 4 मे रोजी भोंग्यांचे  संरक्षण ; 10 मे रोजी राज्यभर आंदोलन

28 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष ऍक्शन मोड मध्ये

           मुंबई (नासिकेत पानसरे):-  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे आणि  राष्ट्रवादी च्या मोठ्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना आता केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष ही ऍक्टिव्ह मोड मध्ये आला आहे. उद्या दि.4 मे रोजी मशिदीवरील भोंगे कोणी जबरदस्ती उतरविण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला असून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे.

           तसेच येत्या दि.10 मे रोजी प्रमोशन मध्ये रिझर्वेशन सह 2019 च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

           तसेच येत्या दि.28 मे रोजी मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड मेळावा  आयोजित करण्यात येऊन रिपाइं चे शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

           भीमछाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या मेळाव्यात ना. रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; श्रीकांत भालेराव;  ऍड.अशाताई लांडगे; दयाळ बहादूर;सिद्धार्थ कासारे; रमेश गायकवाड; विवेक पवार बाळासाहेब गरुड;  ऋषी माळी; संजय भिडे; हरिहर यादव;भावेश तण्णा; शंकर साठे; जयंती गडा; मुस्ताक बाबा; रमेश गौड; ऍड.अभया सोनवणे; उषाताई रामळू;नैना वैराट ;नंदू साठे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

           राज ठाकरे यांनी दि.3 मे रोजी ईद असल्यामुके भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मे ला भोंगे काढणार असल्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत  रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे असे ना रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे. 

           राज ठाकरे यांनी ईशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही व्यक्ती भडकाऊ उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. समाजात शांतता बंधुता सौहार्द टिकविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला असून भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकेला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मौदानात असून कातडी बाचाऊ कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षात स्थान मिळणार नाही.रिपब्लिकन पक्ष हा संघर्षशील आक्रमक क्रांती करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे याची प्रचिती दाखवा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

           येत्या दि.10 मे रोजी पदोन्नती मध्ये एस सी एस टी साठी आरक्षण; 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या घरांना झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्या; भूमिहीनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी; 1990 चा कट ऑफ डेट मध्ये वाढ करून 14 एप्रिल 2000 साला पर्यंत चे गायरान जमीनी वरील भूमिहीन  मागासवर्गीयांचे अतिक्रमण कायदेशीर करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचे आदेश ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले.

           येत्या दि.28 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेश चा प्रचंड मेळावा चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 25 नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा; मुंबईत रिपब्लिकन पक्ष  कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही हा ईशारा देण्यासाठी येत्या दि.28 मे रोजी च्या मुंबई प्रदेश च्या प्रचंड रिपब्लिकन मेळाव्यात पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडवा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. 

           येत्या दि.15 जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियानाची सांगता होणार असून त्या पूर्वी सभासद शुल्क आणि सभासद नोंद पुस्तक रिपाइं च्या मुंबईतील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आदेश ना.रामदास आठवले यांनी दिले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments