Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळेत अनवाणी येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पादत्राणे वाटप

शाळेत अनवाणी येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पादत्राणे वाटप

          सांगोला (कटूसत्य वृत्त)- आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्यावतीने शाळेत अनवाणी येणाऱ्या गरीब व गरजू  विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप करण्यात आली.

          चिंचोली रोड सांगोला येथील कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात शिक्षणासाठी दूरवरून अनवाणी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची दखल आपुलकी प्रतिष्ठानने घेतली आणि अशा विद्यार्थ्यांना समाजसेवक तथा आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य दादा खडतरे यांच्या सौजन्याने दहा विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप करण्यात आली. सध्या कडक उन्हाळा चालू आहे. या विद्यार्थ्यांना घरापासून बरेच अंतर शाळेसाठी चालत जावे लागते आणि हे विद्यार्थी अशा कडक उन्हाळ्यात अनवाणी चालत जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय आपुलकीने घेतला. आपुलकीचे सदस्य असलेले दादा खडतरे यांनी या दहा विद्यार्थ्यांना पादत्राणे देऊन मोठी मदत केली. 

          यावेळी आपुलकीचे  सचिव संतोष महिमकर, दादा खडतरे, अरुण जगताप,  अरविंद केदार,  शरणाप्पा हळळीसागर, उमेश चांडोले, संदेश पलसे आदींसह मुख्याध्यापिका अर्चना गोडसे, सुवर्णा इंगवले, विठ्ठलपंत शिंदे, इतर शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments