परीते सोसायटीवर आ. बबनदादा गटाचा दणदणीत विजय...!

वृत्तांत असा की परिते-अकोले बुद्रुक- परितेवाडी अशा समाईक असलेल्या परिते विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्योतिर्लिंग ग्राम विकास आघाडी विरुद्ध भैरवनाथ विकास आघाडी असे दोन गट आमने सामने उभे होते त्यामुळे या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली होती. परंतु ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीला 13 पैकी 10 जागी दणदणीत विजय मिळाला व विरोधी भैरवनाथ विकास आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी संचालकांचे आमदार बबनदादा शिंदे यांनी तसेच रणजित शिंदे व सभापती विक्रम दादा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे 13 पैकी 10 संचालकांच्या जागा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने ज्योतिर्लिंग ग्राम विकास आघाडीने जिंकल्या आहेत व पराभूत झालेल्या तीन जागा या केवळ अतिशय कमी मतांच्या फरकाने हरलेले आहेत. ज्योतिर्लिंग ग्राम विकास आघाडीच्या विजयानंतर नागरिकांनी आनंदाने जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री मुंडासे यांनी काम पाहिले त्यांना संस्थेचे सचिव रघुनाथ शिंदे आणि सहकार्य केले.
0 Comments