Hot Posts

6/recent/ticker-posts

विठाई बहुउद्देशीय संस्थेचे विविध उपक्रम संपन्न

विठाई बहुउद्देशीय संस्थेचे विविध उपक्रम संपन्न

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त): पंढरपूर येथील विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी प्रिय शिक्षक, शब्द प्रभू वक्ता, माणुसकीचा झरा स्व. उमेशचंद्र खेडकर सर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन आज प्रणव हॉस्पिटल के बी पी कॉलेज पंढरपूर येथे केले होते. या शिबिराचे उद्घाटन वांगीकर क्लासेस चे प्रमुख श्री. प्रशांत वांगीकर सर यांच्या हस्ते स्व. उमेश खेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 

          ही संस्था प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, स्केटिंग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गरजूंना अन्न धान्य वाटप, उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा आदी प्रकारचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असते. 

          आपल्या जिवलग मित्राच्या अकाली जाण्याने माणसाच्या जीवनात पोकळी निर्माण होते. ती पोकळी फक्त माणुसकी भरून काढू शकते. म्हणुन माणसाने माणसाच्या मदतीला धावून आले पाहिजे या हेतूने  'रक्तदान हेच जीवन दान' या उक्तीप्रमाणे  रक्तदान करून सामाजिक जाणीव जपली पाहिजे. म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले होते.

          यावेळी रक्तदाते यांना संस्थेच्या वतीने प्रोत्साहन भेट म्हणुन रक्तदानाचा संदेश देणारे टीशर्ट भेट देण्यात आले. 

          तसेच बदलत्या जीवन शैली मुळे आणि आहार नियोजनच्या अभावामुळे स्थूलपणा, रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार माणसाला जडतात. त्याकडे योग्य वेळी लक्ष वेधले तर हे आजार आपण टाळू शकतो. त्यासाठी शहरातील लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरा बरोबरच 'हर्बल लाईफ' च्या वतीने हेल्थ चेकअप शिबीर  घेण्यात आले होते.

          त्यानंतर संस्थेच्या वतीने झोपडपट्टीतील मुलांसाठी स्व. उमेश खेडकर यांच्या जयंती च्या निमित्ताने फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सोमनाथ गायकवाड,  संस्था अध्यक्ष, श्री. राम मोरे  संस्था सहसचिव,  संस्था सदस्य श्री. अमोल भोरकडे, श्री. रवि ओहोळ सर, सौ. कीर्ती मोरे मॅडम  तसेच स्व. उमेश खेडकर मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments