लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांचे अभिवादन
नवी दिल्ली, (नशिकेत पानसरे): थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे, राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची स्मृतीशताब्दी ६ मे २०२२ रोजी आहे. स्मृतीशताब्दी निमित्त राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी संसद भवनातील महाराजांच्या स्मारकास अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शाहू महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती, काँग्रेसच्या खा. रजनी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, खा. धैर्यशिल माने, खा. नरेंद्र जाधव उपस्थित होते.
0 Comments