Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे हनुमान जयंती निमित्त मिरवणूक संपन्न

टेंभुर्णी येथे हनुमान जयंती निमित्त मिरवणूक संपन्न

युवा नेते राम पवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

           टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे हनुमान जयंतीनिमित्त युवा नेते राम पवार मित्र परिवाराच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

           यावेळी करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते श्री हनुमंताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ही मिरवणूक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून सुरु होऊन कुर्डुवाडी चौक, अण्णाभाऊ साठे नगर, टिळक रोड यामार्गे जाऊन ग्रामदैवत श्री हनुमंत मंदिराजवळ समारोप करण्यात आला.

           यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रम सिंह शिंदे टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद कुटे,  टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय गोंदिल, वडार पॅंथरचे सोलापूर  जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, उद्योजक सुरज देशमुख, काँग्रेसचे माढा तालुका प्रभारी ऋषिकेश बोबडे, ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी जयवंत पोळ, ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहोळ, तानाजी येवले- पाटील, डॉ.सोमनाथ साळुंखे, माजी सरपंच प्रतिनिधी सुधीर महाडिक, परमेश्वर खरात, वैभव महाडिक, राहुल टिपाले,  सचिन पाटील, गोरख देशमुख, नामदेव धोत्रे, संतोष धोत्रे,वडार समाजाचे नेते दिलीप पवार, शिवराम पवार, मी वडार महाराष्ट्राचा टेंभुर्णी शहर  कार्याध्यक्ष प्रतीक माने, संदीप देशमुख, दीपक वाघमोडे, नितीन खटके, कैलास पवार, नितीन चव्हाण,  बाळासाहेब भोज, रियाज मुलाणी, संतोष शिंदे,टिंकू किर्ते ,बाबा पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

           मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिरवणूक अध्यक्ष विकास सुर्वे, उपाध्यक्ष शांतीलाल माने,खजिनदार सुरज पवार,कार्याध्यक्ष अजय पवार,सचिव प्रेमानंद धोत्रे,सहसचिव लहू चव्हाण,मिरवणूक प्रमुख सुरज जाधव,योगेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments