सोलापूरच्या विकासासाठी सोशल फाउंडेशन प्रयत्नशिल - आ. सुभाष देशमुख


यावेळी तालवाद्य वादक नागेश भोसेकर, पर्यावरण व वन्यजीव संरक्षक संतोष धाकपाडे, सुंद्रीवादक कपिल जाधव, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे अभियंता दिलीप मिसाळ, ध्वनिमुद्रिका संग्राहक मोहन सोहनी व जयंत राळेरासकर यांना श्रीमंती सोलापूरची पुरस्कार देण्यात आला.
यावेळी संतोष धाकपाडे यांनी वन्यजीवांचे संरक्षण करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. नागेश भोसेकर यांनी जन्मभूमी सोलापूरचा सन्मान आपल्याला महत्त्वाचा वाटतो असे सांगताना, कलाजीवनातील अनुभव सांगितले. महाराष्ट्रात पारंपरिक वाद्यांच्या प्रशिक्षणाची सोय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
धैर्यशील पाटील यांनी शहरांची श्रीमती पैशात न मोजता कलागुणांत मोजली जावी असे प्रतिपादन केले. एखादी कला अवगत केली तर जीवन चांगले जगता येते म्हणून सर्वांनी कला व छंद आपलेसे करावेत असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी आ. सुभाष देशमुख हे जिल्ह्याच्या विकासाची निश्चित दिशा पकडून काम करणारे नेते असल्याचे सांगत त्यांनी सोलापुरात चित्रनगरी उभी करावी अशी सूचना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. प्रा. नरेंद्र काटीकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश पवार यांनी आभार मानले.
0 Comments