Hot Posts

6/recent/ticker-posts

भव्य नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन सरपंच बाळासाहेब ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आले

भव्य नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन सरपंच बाळासाहेब ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आले

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित भव्य नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन सरपंच बाळासाहेब ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आले.

          या हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी सरपंच अरुण लोकरे,माजी सरपंच नवनाथ जगताप,उपसरपंच समाधान लोकरे,संतोष केंदळे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे,उपअभियंता कुमार चव्हाण, सूर्यकांत हांडे,मल्हारी गवळी,नितीन जगताप,रोहिदास लोकरे,भैय्या यादव, पांडुरंग लोकरे,प्रकाश जगताप,किरण जगताप,विकी कसबे,प्रतीक लोकरे,कुमार जगताप,तात्या कोळी,अमित गुरव,उप अभियंता महेश पवार,राजू तांबोळी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

          या स्पर्धेसाठी अकलूज,टेंभुर्णी,वाशिंबे, भिमाननगर,सुर्ली,कंदर,गलांडवाडी, फुटजवळगाव व शिराळ (टें) येथील १४ हॉलीबॉल संघ सामील झाले होते.या स्पर्धेत भिमानगर हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून अकलूज हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला तर शिराळ (टें)तृतीय क्रमांक मिळवला व भिमानगरच्या द्वितीय संघाने चौथा क्रमांक मिळविला.विजेत्या हॉलीबॉल संघांना सरपंच बाळासाहेब ढेकणे यांच्या वतीने रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिराळ (टें) हॉलीबॉल संघाच्या सदस्यांनी व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments