रोटरी क्लब अकलूजच्या वतीने महात्मा फुले जयंती निमित्त सामाजिक उपक्रम

अकलूज (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि मोरया प्रतिष्ठाण माळेवाडी-बोरगांव यांचे संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी अंगणवाडी शाळा, पिसेमळा माळेवाडी, बोरगांव येथे रक्तदान शिबीर तसेच किशोरवयीन मुली, महिला यांचेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरामध्ये एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला. तर किशोरवयीन मुली आणि महिला यांचेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण 77 किशोरवयीन मुली आणि महिला यांची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, भाजपा जिल्हा संघटक, प्रतापराव पाटील पंचायत समिती सदस्य, रविंद्र पाटील, सरपंच, अरुण सुगांवकर पोलीस निरीक्षक, अकलुज या मान्यवरांनी भेट देऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे कौतुक केले. तसेच रो.सीए.नितिन कुदळे यांनी माळेवाडी येथे वाचनालय झाले तर त्यासाठीची पुस्तके स्वत: उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातून वाचनालयाचे इमारतीसाठी निधी देऊ असे सांगितले.
यावेळी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने गझी ढोल स्पर्धा व लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिरासाठी अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीचे तर मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय अकलूज, जय हिंद लॅब इंदापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हि दोन्ही शिबिरे यशस्वी होण्यासाठी मोरया प्रतिष्ठाण बोरगाव माळवाडी चे अध्यक्ष अक्षय पिसे, विकास पिसे, सर्व सदस्य, रोटरी क्लब अकलुजचे अध्यक्ष रो.सीए.नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजाळ, रोटरी सदस्य, बोरगाव माळेवाडीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका टेके मॅडम, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments