Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कुरुल मध्ये मोठ्या उत्साहात साजरी...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कुरुल मध्ये मोठ्या उत्साहात साजरी...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रा. जि.प. शाळेमध्ये खाऊ वाटप

         कुरुल (कटूसत्य वृत्त):- दि :११ एफ्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कुरुल या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे सर यांनी केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतुल ननवरे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अतुल ननवरे नानासाहेब ननवरे दादासाहेब ननवरे दत्तात्रय चव्हाण व मुख्याध्यापक मुचंडे सर यांच्या हस्ते करण्यात आलं.

         मनोगत व्यक्त करताना नानासाहेब ननवरे म्हणाले कि आद्यसमाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची आज १९५ वी जयंती साजरी केली आहे. प्रथमतः महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षित करून महिलांसाठी शाळेची सुरुवात केली. महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त दिला. त्यानाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आदराचे स्थान निर्माण करून दिले. 

         देशात स्वातंत्र, समता व बंधुता याचे बीज समाजात रोवले. त्यामुळे देशात मोठी सामाजिक क्रांती झाली. या महापुरुषांचे विचार आपण कायमस्वरुपी आचरणात आणण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवीत समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात उपलब्ध करून देऊ असा संकल्प करूया.  माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे व नानासाहेब ननवरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी कुरुल ग्रामपंचायत सरपंच माणिक पाटील ,महादेव महाराज माळी, औदुंबर साळुंके,धनाजी माळी, पांडुरंग माळी, अशोक क्षीरसागर, लक्ष्मण भालेराव,श्रीपती डुणे, संतोष (बंडु) जाधव, संतोष जाधव, सुरेश माळी सुभाष माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments