तुकाराम भारत म्हमाणे यांना पी.एचडी. पदवी प्रदान

अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथील प्राध्यापक व वडाचीवाडी(ता.मोहोळ) गावचे सुपुत्र तुकाराम भारत म्हमाणे यांना सीएसआयआर- आय. आय. सी. टी. हैदराबाद येथील "अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च"या संस्थेची पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी "डिझाईन अँड सिंथेसिस ऑफ नोवेल ग्लायकोपेप्टाईड अँड ग्लायकोलिपोपेप्टाईड बेस्ड व्हेक्सिन एडज्यूवंट्स" या रसायनशास्त्र मधील विषयात आपला प्रबंध सादर केला.त्यांनी MSc (Organic Chemistry) चे शिक्षण नांदेड युनिव्हर्सिीटी, नांदेड मधून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी CSIR- NET-JRF(AIR-65) उत्तीर्ण होऊन हैदराबाद मधील संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यास फेलोशिपसाठी निवड करण्यात आली होती.
त्यांच्या या यशाबद्दल अनगर नगरपंचायत कार्यालयात माजी आमदार राजन पाटील यांनी यथोचित सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
अनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळराजे पाटील व सचिव अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य डाॅ. चंद्रकांत सुर्यवंशी, प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गणेश पावले, पांडुरंग थिटे, राम कदम, भगिरथ गुंड,श्रीधर गुंड,कुमार गवसणे,बंडू वायचळ व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments