Hot Posts

6/recent/ticker-posts

विरोध डावलून अखेर कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा

 विरोध डावलून अखेर कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत, नियोजित रे नगर आणि गोदूताई वसाहतीसह नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी कुंभारी गावकऱ्यांनी केली होती. कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला नगर परिषद दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली अखेर सोमवारी याबाबतची नगरविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर झाली आहे विरोध डावलून कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा दिला आहे.

          जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अधिसूचना प्राप्त झाली आहे. शंभरकर आता स्वतंत्र आदेश काढून नगरपरिषदेची अंमलबजावणी सुनावणी घेणार आहेत. हरकती सुनावणी घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे.

          त्यानंतर नगरपरिषदेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकाची नियुक्ती होईल. तसेच जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रमासोबत नवीन कुंभारी नगरपरिषदेची देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदार यादीच्या आधारावर कुंभारी नगरपरिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी संबंधित गावची लोकसंख्या २५ हजारांवर असली पाहिजे.

          कुंभारी गावची विडी घरकुलची लोकसंख्या वीस लोकसंख्या १७ हजार आहे. ते पंचवीस हजार आहे. त्यासोबत सेच कुंभारी हद्दीतील गोदूताई कुंभारीच्या हद्दीत रे नगर प्रकल्प साकार होत आहे.

          ३० हजार घरकुलांमागे एक ते सव्वा लाख लोकसंख्या राहील. त्यामुळे भविष्यात कुंभारीची लोकसंख्या जवळपास दीड लाख राहिल. या पार्श्वभूमीवर कुंभारी ग्रामपंचायत, रे नगर तसेच गोदूताई वसाहतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. प्रस्तावानुसार कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments