|| ... मी माझ्या घरावर लावणार #भगवी #गुढी ... ||
चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या आदल्या दिवसी, म्हणजे अमावस्येला, छत्रपती संभाजी महाराज यांची [४१] एक्केचाळीस दिवस प्रचंड हाल-हाल करुन हत्या केली. संभाजी राज्यांच्या देहाचे तुकडे-तुकडे करून भीमा इंद्रायणीच्या डोहात फेकून दिले. दुसऱ्या दिवसी म्हणजे पाडव्याला काही विघ्नसंतोषी लोकांनी वाईट हेतुपूर्वक आनंदोत्सव साजरा केला. अपमान जनक प्रतीके वापरली. साडी-चोळीत बांबू घालून,उलटा तांब्या घरावर लटकवला.त्याला कडू लिंबाची पानं आणि एरंडाची लाकडं बांधून घरावर गुढी उभारली.संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडून सुतक पाळत असतांना, काही लोकं हत्तीवरून साखर वाटत होती. या त्यांच्या कृतीतून त्यांचा सांगण्याचा उद्देश होता की, हे बहूजन-मराठ्यांनो आता तुमचा राजा मारला.आता तुमच्या इज्जतीचं रक्षण करणारा कोणीच उरला नाही. आता तुमची इज्जत आणि इभ्रत आम्ही वेशीला टांगली आहे. म्हणजे तुमच्या साडी-चोळीत आता आमचा बांबू आहे. आता आम्हाला अडवायला कोणाची हिंमत नाही. आशा उन्मादात त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आजही संभाजी राजांची हत्या आठवली की मन गलबलून येतं.
तेंव्हा अपमानजनक प्रतीकं असलेली गुढी आम्ही उभारणार नाही.
बांधवांनो..संभाजी महाराजांच्या बलिदानाला मानवंदना म्हणून,ज्या भगव्यासाठी संभाजी राजांनी आपलं रक्त सांडलं ती भगवी पताका आपण आपल्या घरांघरावर उभारून संभाजी राजांना मानवंदना देऊया...
|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय संभाजीराजे ||
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
0 Comments