वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, कामकाजात सुधारणा करत पुर्नबांधणी करणार - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 5, 2022

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, कामकाजात सुधारणा करत पुर्नबांधणी करणार - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, कामकाजात सुधारणा करत पुर्नबांधणी करणार - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

(वृत्त सेवा):- महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या शासनाच्या कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ दिले जाणार नाही. याउलट या कंपन्यांमधील कामकाजांमध्ये अधिक सुधारणा करत पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहे, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज वीज कर्मचाऱ्यांना दिले.यावेळी डॉ. राऊत म्हणाले की, वीज क्षेत्रापुढे वीज गळतीचे मोठे आव्हान आहे. यासाठी वीज कामगार अहोरात्र काम करून वीज गळती व वितरणात उत्कृष्ट काम करत आहेत. कोरोना काळात वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. या दोन वर्षांच्या काळात राज्यात कोठेही वीज खंडित झाली नाही. वीज ग्राहक ऊर्जा खात्याचा अन्नदाता आहे. वीज वितरणाच्या माध्यमातून या ग्राहकांची सेवा करत आहोत. उर्जा विभाग व जनता यामधील हा सलोखा स्नेहाचा, आपुलकी आणि प्रेमाचा आहे. वीज क्षेत्रामध्ये जवळपास ४० हजार तांत्रिक कामगार आहेत. या कामगारांचे हित जोपासण्याचे काम शासन करेल.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्जामंत्री असतांना वीज धोरणांची पायाभरणी करण्यात आली. तेव्हा त्यांनी देशभरात वीज पुरवठा करण्यासाठी नॅशनल ग्रीडची संकल्पना मांडली. प्रत्यक्षात देशात नॅशनल ग्रीडला ३१ डिसेंबर २०१३ मध्ये सुरुवात झाली. या माध्यमातून आज देशात सुरळीत वीज पुरवठा सुरू आहे. असे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.ऊर्जामंत्री डॉ. राऊत पुढे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी सातत्याने काम केले. कृषी वीज जोडणी धोरण २०२० नुसार शेतपंपाच्या बिलांमध्ये सूट दिली. यानुसार वीज वसुलीनुसार ग्रामपंचायती व जिल्हा परिषदांना विद्युतविषयक कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. वीज धोरण २००३ नुसार वीजक्षेत्रातील कंपन्यांच्या कामकाजात सुधारणा करत पुर्नबांधणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच राज्याच्या इलेक्ट्रिक धोरणानुसार वीज विभागातील अधिकाऱ्यांनी यापुढे विजेवर चालणाऱ्या चारचाकी वाहने खरेदी करावीत. कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी, वेतनकरार, अनुकंपा नोकरी, इंधन भत्ता या विषयावर येत्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.विद्युत क्षेत्र कामगार युनियन चे २०व्या द्विवार्षिषक महाअधिवेशनाचे  येथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक डॉ. नरेश गिते, महानिर्मितीचे संचालक डॉ. मानवेंद्र रामटेके, महापारेषण संचालक सुगत गमरे, ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार उत्तमराव झाल्टे आदी अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages