अवैद्य गुटखा विक्रीवर डिबी पथकाची कारवाई ३ लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील अण्णाभाऊ साठे नगर भागातील एका दुकानात अवैध्यरित्या बेकायदा विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेला ३ लाख १२ हजार रुपये किमंतीचा गुटख्याचा साठा पोलिसांनी पकडला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील साठे नगर भागामध्ये एका दुकानांमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवलेला होता त्यामध्ये आर.एम. डी. एम. सुगंधित तंबाखू, गोवा, रजनीगंधा, पान मसाला, रत्ना सुगंधित तंबाखू,बाबा ब्लॅक च्युविंग तंबाखू,सुगंधित तंबाखू अशा प्रकारचा साठा मुद्देमाल मोहोळ पोलिसांना मिळून आला हा सर्व गुटखा राजकुमार शिवशंकर कुर्डे रा.साठे नगर (ता. मोहोळ ) यांनी साठवलेला होता. पोलिसांनी अन्न आणि भेसळ निरीक्षक कुचेकर यांना ही माहिती कळवून सर्व मुद्देमाल आणि आरोपी राजकुमार कुर्डे याला ताब्यात घेऊन भा.द.वि कलम संहिता १८८, २७२,२७३, ३२८ या कलमाद्वारे गुन्हा नोंद करून कुर्डे याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलिस पोहेकाँ.शरद ढावरे, पोना. अमोल घोळवे, पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांनी ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहेत.
0 Comments