Hot Posts

6/recent/ticker-posts

जानकरवस्ती येथील सिंगल फेज ट्रासफार्मर आठ दिवसात न बसवल्यास म.रा.वि.वि.कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार : सतिशभाऊ सावंत

जानकरवस्ती येथील सिंगल फेज ट्रासफार्मर आठ दिवसात न बसवल्यास म.रा.वि.वि.कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार : सतिशभाऊ सावंत

          सांगोला(कटूसत्य वृत्त):-  सांगोला शहरातील जानकर वस्ती येथील सिंगल फेज ट्रासफार्मर आठ दिवसात न बसवल्यास सांगोला शहरातील रेल्वे रेल्वे रुळाच्या पश्‍चिमेकडील जानकर वस्ती ते गेली अनेक वर्षे सिंगल फेज लाईट नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे हा सिंगल फेज चा ट्रान्सफार्मर आठ दिवसाच्या आत न बसवल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांनी दिला आहे.

          सांगोला शहरातील जानकर वस्ती येथे सिंगल फेज लाईट ची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे गेली पाच-सहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून हा सिंगल फेज ट्रांसफार्मर मंजूर करून घेऊन ठेकेदाराला वर्कऑर्डरही दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करून व संबंधित अधिकार्‍यांना समक्ष भेटून ही अधिकारी दखल घेत नाहीत त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात ग्रामीण प्रमाणे विद्युत पुरवठा होत आहे. या भागातील नागरिकांचे घरातील बल्ब, फ्रीज, कुलर, टी.व्ही. पंखे आदी विद्युत उपकरणांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने जळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. गेली अनेक वर्षे या भागातील नागरीक आम्ही शहरात राहतो, आम्हाला शहराप्रमाणे सिंगल फेज विद्युत पुरवठा करावा अशी मागणी संबंधित अधिकार्‍यांकडे करूनही अधिकारी नागरिकांची कसलीही दखल घेत नाहीत.तरी आठ दिवसाच्या आत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गंभीर दखल घेऊन जानकर वस्ती चा सिंगल फेज चा ट्रांसफार्मर न बसवल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला नागरिकांना घेऊन टाळे ठोकणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments