Hot Posts

6/recent/ticker-posts

धनराज शिंदे यांच्या हातून समाज हित उपयोगी कामे - तहसीलदार राजेश चव्हाण

धनराज शिंदे यांच्या हातून समाज हित उपयोगी कामे - तहसीलदार राजेश चव्हाण

          कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त):-  समाजाच्या उपयोगाचे काम माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून होत असुन,सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३० कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करुन खऱ्या अर्थाने अश्रू पुसण्याचे काम धनराज शिंदे यांनी केले असल्याचे,प्रतिपादन माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले.

          दहिवली निमगाव टें तालुका माढा येथे सोमवारी ४ एप्रिल रोजी नाम फाउंडेशन व माढा वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त ३० शेतकरी कुटुंबियांना मदत निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ३० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे मदत निधी वाटप उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

          यावेळी गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील,जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील,उपसभापती धनाजी जवळगे,जलसंधारण विभागाचे उप अभियंता पंडित भोसले,बांधकाम विभाग उप अभियंता एस.जे.नाईकवाडी,पंचायत समिती सदस्या यशोदा ढवळे,रुपाली पाटील,प्रज्ञा कुटे,वैशाली पाटील,शहाजी शिंदे,सुरेश बागल ,वैभव कुटे,संजय पाटील, श्रीकांत पाटील,सतिश पाटील,दहिवली चे सरपंच तय्यब जहागिरदार,निमगाव टें माजी सरपंच ‌ रविंद्र शिंदे,शशिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.

          यावेळी गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम धनराज शिंदे करत असुन गेल्या तीन वर्षांपासून माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्य संपूर्ण जिल्हाभर पसरलं आहे. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे म्हणाले की , धनराज शिंदे यांनी माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठं काम केले आहे.सरपंच संघटनेचे जयंत पाटील म्हणाले की , शेतकऱ्यांच्यासाठी जो काम करेल तोच खरा नेता भविष्यात टिकेल.

          यावेळी शहाजी शिंदे ,यशोदा ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील रंगनाथ टेळे,निर्मला कोळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमासाठी महेश डोके ,बंटी शिंदे,महेश मारकड,शरद तज्ञघाडगे,आनंद पानबुडे,केशव आवटे,सुजित भोसले,कुटे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन रविंद्र जाधव यांनी तर प्रस्ताविक संदीप शिंदे केले तर आभारप्रदर्शन धनराज शिंदे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments