10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये बंपर भरती ! परीक्षा न देताच मिळणार नोकरी

नवी दिल्ली (वृत्त सेवा):- रेल्वे भरती सेल, RRCने पूर्व रेल्वेमध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी 11 एप्रिल 2022 पासून RRCCR, rrcer.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज केले जाऊ शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 असेल याची नोंद घ्यावी. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या माध्यमातून रोजगाराची संधी दिली जाते.यावर्षी देखील 2792 शिकाऊ पदांवर भरती घेण्यात आली आहे. या अंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेकडून एक वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देखील मिळेल.प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना येणाऱ्या गट डी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देखील दिलं जाणार आहे. सध्याच्या RRB गट डी भरतीमध्ये देखील शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमतेच्या परीक्षेसाठी सूट देण्यात आली आहे.2792 पदांमध्ये हावडा विभागात विभागात 659, आसनसोल विभागात 412, लिलुआ विभागात 612, कांचरापारा विभागात 187, मालदा विभागात 138, सियालदह विभागात 297, कांचरापारा विभागात 187, मालदा विभागात 138, आणि जमालपूर विभागात 667 पदांचा समावेश आहे.शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण सोबतच या जागांवर ITI प्रमाणपत्रधारक देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी किमान वय 15 आणि कमाल वय 24 असावं.
0 Comments