Ads

Ads Area

छत्रपतींच्या शौर्याची 'साऊथ'लाही भूरळ; RRR मधील 'विजयी वार है वीर मराठा' गाण्याचा धुमाकूळ

 छत्रपतींच्या शौर्याची 'साऊथ'लाही भूरळ; RRR मधील 'विजयी वार है वीर मराठा' गाण्याचा धुमाकूळ


हैद्राबाद (वृत्त सेवा):- महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन मुघलांना सळो की पळो करून सोडलं. हिंदवी स्वाराज्याची स्थापना केली. जगभरात महाराजांचं शौर्य पोहोचलं आहे.


मात्र महाराजांवर अद्याप भव्यदिव्य सिनेमा झाला. मात्र आता साऊथ इंडस्ट्रीला शिवाजी महाराजांच्या शौर्याची भूरळ पडल्याचं दिसून आलं.


बाहुबली चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या एस.एस. राजामौली यांचा आगामी RRR चित्रपट सध्या चर्चेत आहे. राम चरण, एनटीआर आणि आलिया भट प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचं एक गाण नुकतीच रिलीज करण्यात आलं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं.


'शोले' असं या गाण्याचं टायटल असून त्यात इतिहासातील महापुरुषांना नमन करण्यात आलं. राष्ट्रगीताप्रमाणे क्रम लावून महापुरुष दाखविण्यात आले. गाण्यात 'विजयी वार है वीर मराठा', असे बोल आहेत. गाण्यात एनटीआर आणि रामचरण महाराजांसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close