ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित करणार नाही या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत - रवींद्र कांबळे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेले अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये थकीत विज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात होते या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते आमचे नेते जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनीदेखील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वीज तोडणी थांबली पाहिजे याबाबतची भूमिका त्यांनी मांडली होती तसेच सामान्य शेतकऱ्यांची देखील मागणी होती याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब यांनी आज विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या हाती पीक येई पर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित नाही याबाबतची ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे ही घोषणा केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब यांचे जाहीर आभार मानतो असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments