सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघामार्फत ग्रंथालयांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांनी दिली.
धरणे आंदोलन विषयी माहिती देताना अध्यक्ष म्हणाले मागील दहा वर्षापासून राज्य ग्रंथालय संघ व संलग्न संस्था संघटनांचे तर्फे निवेदने, धरणे, मोर्चा, आंदोलने, या मार्गाने आमदार, खासदार ,राज्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, यांच्यामार्फत पाठपुरावा करीत आहोत. परंतु प्रत्येकक्षात आमची कोणतीही मागणी मागील दहा वर्षात शासनाने मंजूर केलेली नाही. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन सध्या दिले जाते त्यात जीवन मानानुसार व महागाई निर्देशांकानुसार वाढ करणे अपेक्षित आहे वाढती महागाई लक्षात घेता परिरक्षण अनुदानात वाढ केली गेली पाहिजे परंतु नियमित अनुदानाचा हप्ता ही दिला जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची परवड सुरू आहे कोरोना मुळे वाचनालयाच्या उत्पन्नात घट झाली असताना नियमित अनुदानही वेळेवर दिले दिलेली नाही त्यामुळे परिस्थिती आणखीनच दयनीय झाली आहे. काळाची गरज ओळखून सार्वजनिक ग्रंथालयांना किमान तिप्पट परिरक्षण अनुदान वाढ दिली पाहिजे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहून आम्ही आश्ववस्त होतो परंतु चालू अर्थसंकल्पात वाढीव तरतूद नसल्यामुळे आणि विधिमंडळातील प्रश्न उत्तरातून शासनाची दिरंगाई ची भूमिका लक्षात आलेमुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि 21 मार्च 20 22 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलनात राज्यातील 12145 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील 21 हजार 615 कर्मचारी आणि सुमारे 85000 पदाधिकारी यांचा प्रातिनिधीक सहभाग राहणार आहे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आव्हान राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ डॉ. गजानन कोटेवार, सोलापूर जिल्हा संघाचे मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे प्रमुख कार्यवाह ग्रंथमिञ विजयकुमार पवार, उपाध्यक्ष जोतिराम गायकवाड ,सहकार्यवाह साहेबराव शिंदे, कोषाध्यक्षा शैलशिल्पा जाधव ,सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अशोकराव गंगाधरे ,सचिव अशोक व्हटे ,कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय सरगर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
0 Comments