शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे थांबवा अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अन्जदाता शेतकरी वर्षभर शेतात राबतो आणि ऐन उन्हाळ्यात जर शेतातील वीज कापून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर आम आदमी पार्टी ते खपवून घेणार नाही. एक ही दिवस उन्हाळ्यात जर शेतजमिनीला पाणी उशिरा झाला तर अख्या वर्षाच्या मेहनीतीवर पाणी फेरले जाते आणि मग शेतकऱ्याला कठोर पाऊले उचलावे लागते. 10/12 दिवसाअगोदर एका युवकाने ह्याच विजेच्या कारणामुळे आत्महत्या केला. याला आपण सरकारला जबाबदार धरत आहोत कारण सरकार जे आपल्या जाहीरनाम्यात वीज स्वस्त करू आणि नियमित करू असे आश्वासन दिले होते. परंतु असे काही झाले नाही. तरी याविषयावर आपण लवकरत लवकर कार्यवाही करावे अन्यथा आम आदमी पार्टी यावर जोरदार आंदोलन करेल अशी मागणी सागर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments