Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला कृषि विभागामार्फत एकदिवशीय मोहिमेअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 सांगोला कृषि विभागामार्फत  एकदिवशीय मोहिमेअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न



       सांगोला (कटूसत्य वृत्त):- दिनांक १६/०३/२०२२ रोजी सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये  कृषि विभागामार्फत महाडिबीटी , पि.एम.एफ.एम.इ. , डाळिंब पिकावरील पिन होल बोरर व्यवस्थापण , भौगोलिक मानांकन नोंदणी , अनारनेट नोंदणी बाबत शेतकरी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये कृषि विभागाच्या महाडिबीटी अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरून शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांसाठी अर्ज करणे , कागदपत्रे आपलोड करणे , संबंधीत बाब राबविणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योगांचे उन्नयन योजनेअंतर्गत ज्वारी व ईतर प्रक्रिया प्रकल्प उभारणी बाबत मार्गदर्शन करून अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर डाळिंब पिकावर भेडसावत असलेल्या पिन होल बोरर( खोड भुंगेरा ) या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापणासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी या मोहिमेअंतर्गत मौजे.वझरे येथे बोलताना शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन कृषि विभाग व शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पिन होल बोरर वर एकात्मिक उपाययोजना करून आपले डाळिंब बागा वाचवाव्यात. त्याचबरोबर डाळिंब भौगोलिक मानांकन व अनारनेट वर नोंदणीसाठी अर्ज करणेसाठी आवाहन केले. सदरील मोहिमेमध्ये मंडळ कृषि अधिकारी,   कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांनी गावोगावी उपस्थित राहुन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम राविले.

Reactions

Post a Comment

0 Comments