सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या स्वाती माने हिने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री फार्मसी कॉलेज,मेथवडे या महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचा फायदा त्यांना होत आहे. डॉ.एन.जे.पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी,अहमदनगर या महाविद्यालयाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्फुर्त सहभाग नोंदवला.या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत महाविद्यालयाची एम.फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.स्वाती तुकाराम माने हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी तिला तिची वर्गमैत्रिण कु. स्वाती आगवणे हिने मदत केली. तसेच या यशस्वी विद्यार्थिनीस डॉ.एम.जि.शिंदे, प्रा.ए.एम.तांबोळी, प्रा.एस.एस.काळे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी अभिनंदन करून तिला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या
0 Comments