Hot Posts

6/recent/ticker-posts

आमच्या हक्काच पाणी आम्हाला द्या':लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांचा टाहो.

 आमच्या  हक्काच पाणी आम्हाला द्या':लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांचा टाहो




कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना बसतोय फटका 


सांगोला (जगन्नाथ साठे):- कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अधिकार्याच्या गलथान आणि  ढिसाळ  नियोजनामुळे राजेवाडी तलावातून मिळणाऱ्या सांगोला तालुक्यातील भीमा लक्ष्मीनगर चिक-महूद सदानी अचकदाणि नरळेवाडी शिवणे या भागातील अनेक शेतकऱ्यांना गामातील पाणी न दि नियोजनानुसार अजूनही मिळालेले नाही त्यामुळे ल्यामुळे अनेक या भागातील शेतकरी कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मग्रुरी आणि बेफाम वागण्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे लक्ष्मीनगर येथील संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सांगोला तालुक्यातील महुद येथे कार्यालय असून हे कार्यालय कायम बंद अवस्थेत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.संबंधित गावातील अनेक शेतकरी पाणी माहिती अर्ज मागणी अर्ज देण्यासाठी कार्यालयात  गेले असता अधिकारी आणि तेथील स्टाफ उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता शेतकऱ्यांनाच अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगितले. त्यामुळे लक्ष्मीनगर चिकमहूद, अचकदाणी, नरळेवाडी या भागातील हातात तोंडाला आलेली  पिके पाण्याअभावी जळत असल्याचे दिसून येत आहे. कलिंगड, ऊस, भुइमूूगाची शेंगाची पिके,मका ई काम झाले मी इत्यादी पिके उध्वस्त होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .त्यामुळे येत्या काही दिवसात जर पाणी नाही सोडले  तर हातातोंडाला आलेल्या शेतकर्‍याचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकरी मात्र पुन्हा एकदा उघड्यावर पडणार असल्याची वस्तुस्थिती या भागातील शेतकऱ्यांची आहे.या भागातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकानुसार आणि पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार पाणी मागणी अर्ज आणि पाणी  फी सुद्धा महुद येथील कार्यालयात जमा केली आहे. परंतु महूद येथील कार्यालयातील गलथान अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत आहे. जवळपास पंधरा दिवसांपासून अधिक दिवस शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली असताना अधिकारी मात्र आपल्याच तोऱ्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका बाजूला महावितरणचा दिलासा कुठे मिळतो ना मिळतो तोच दुसऱ्या बाजूला जुलमी अधिकाऱ्यांच्या बेफाम वागण्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या  येत्या दोन दिवसात जर राजेवाडी  तलावातील पाणी नियोजनाप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना नाही सोडले तर  संबंधित कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे. राजेवाडी  तलावातील आमच्या  शेतीसाठी येणारे हक्काचे पाणी आम्ही नियमानुसार पाणी फी भरून सुद्धा आम्हाला वेळेत पाणी मिळत नाही.याला केवळ कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्या  गलथान नियोजनाअभावी शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन दिवसात पाणी नाही जर सोडली तरी आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहे --धर्मराज गोडसे (संतप्त शेतकरी)  आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या महूद येथील कार्यालयात पाण्याच्या चौकशीसाठी संपर्क साधला असता कार्यालयात कोणीच उपस्थित नसते.  गेले पंधरा दिवस कोणीही अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले. ऑफिसला गेले असता शेतकऱ्यांना अपमानाची वागणूक दिली जाते.आणि त्यांच्या पाणी मागण्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवल्याचे काम आतापर्यंत या विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केले आहे. दोन दिवसात नाही पाणी आलं तर आम्ही या कार्यालयाच्या  विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.सचिन बाड (संतप्त शेतकरी)

Reactions

Post a Comment

0 Comments