सुंदर माझे कार्यालय संकल्पनेनुसार सांगोला तहसील कार्यालयाचा झाला कायापालट
सांगोला तहसील कार्यालयातील कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा मानस तहसीलदार-अभिजीत पाटील
सांगोला (जगन्नाथ साठे ) सुंदर माझे कार्यालय या संकल्पनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा मार्गदर्शक सूचनेनुसार सांगोला तहसील कार्यालयाचा कायापालट होताना दिसून येत आहे. तहसील कार्यालय परिसरातील पुरवठा शाखा, सेतु विभाग, उपकोषागार कार्यालय, निवडणूक विभाग, रेकॉर्ड रूम आधी विभागा मध्ये रंगरंगोटी केल्याने त्या विभागातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. सामान्य नागरिक नागरिक सांगोला तहसील कार्यालय आणि परिसरातील झाडांची विलोभनीय रंगरंगोटी पाहून आनंदित होत आहेत. तर नुसतं कार्यालय सुंदर असून चालत नाही,तर येणार्या काळात तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागातील कामकाज हे अधिक पारदर्शक, गतिमान करण्याचा मानस असल्याचा विश्वास तहसीलदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुंदर माझे कार्यालय या संकल्पनेनुसार तहसील कार्यालय आणि संपूर्ण तालुक्यातील तलाठी कार्यालय लोकसहभागातून सुशोभित करण्याचा संकल्प प्रशासनाच्या वतीने केला आहे. त्या संकल्पने नुसार तालुक्यातील अनेक गावातील तलाठी कार्यालय शोभनीय झाली आहेत. तर सांगोला तालुक्यातील महत्त्वाचे आणि नागरिकांच्या सेवा सुविधा असणारे तहसील कार्यालयाचा परिसर मात्र सुशोभीकरनाणे विलोभनीय दिसत आहे.त्यामुळे नागरिक आनंदित होत आहेत.आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेल्या आमदार फंडातील लाखो रुपयांचा निधी आणि लोकसहभागातून मिळालेला निधी यांचा योग्य ताळमेळ घालून तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगोला तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या विविध झाडांना आकर्षक रंगरंगोटी केल्याने तहसील कार्यालयाचा परिसर अधिकच सुंदर दिसत आहे. नागरिकांना आपले काम अधिक जोमाने, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या विविध विभागात आवश्यक ते बदल सुद्धा करणार असल्याचा विश्वास तहसीलदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील तलाठी कार्यालय असेच लोकसहभागातून सुशोभित करण्याचा मानस आहे. सुंदर माझे कार्यालय या संकल्पनेनुसार सांगोला तहसील कार्यालयाचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात तहसील कार्यालयातील सर्वच विभागातील कारभार अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा मानस आहे.-अभिजीत पाटील (तहसीलदार सांगोला)
0 Comments