Hot Posts

6/recent/ticker-posts

आरटीओ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाणप्रकरणी १५ जणांवर गुन्हा कंटेनर धडकेतील मृताचे नातेवाईक झाले होते संतप्त

 आरटीओ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाणप्रकरणी १५ जणांवर गुन्हा


कंटेनर धडकेतील मृताचे नातेवाईक झाले होते संतप्त


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ चौदा मार्च रोजीच्या वडवळजवळ झालेल्या अपघातानंतर जमावाने हा अपघात आरटीओच्या गाडीने कंटेनरला आडवी गाडी लावली म्हणून झाला आहे, असा आरोप केला होता. आरटीओच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जमावाने शिवीगाळ व मारहाण करीत शासनाच्या गाडीच्या काचा फोडून दोन लाख रुपयांचे नुकसान केले होते. त्याप्रकरणी अपघातामध्ये मयत झालेेल्या शेतकऱ्याच्या मुलासह अन्य १५ जणांवर शासकीय कामामध्ये अडथळा केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : १४ मार्च रोजी मोहोळ येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक राजेश रणजित आहुजा व शिवाजी निवृत्ती सोनटक्के यांच्यासह वाहनचालक शिवाजी गायकवाड हे मोहोळ पोलिस ठाण्यात येऊन एका अपघातामधील टाटा पिकअप गाडीची यांत्रिक तपासणी केली. त्याचा अहवाल देऊन सोलापूरकडे निघाले होते. सोमवारी दुपारी दोन वाजता मोहोळ हद्दीमध्ये हॉटेल शीतलजवळ रस्त्याच्या कडेला कंटेनर (एमएच ४६ बीएम २९१०) उभा होता. याची माहिती घेण्यासाठी आरटीओचे वाहन कंटेनरच्यासमोर उभे करून चौकशी करताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने कंटेनरला धडक दिली. त्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. आरटीओ कर्मचाऱ्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात संपर्क करून घटनेची माहिती देत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करत असताना जमावाने हा अपघात आरटीओच्या वाहनामुळेच झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना मारहाण करत शासकीय गाडीच्या काचा फोडून गाडीची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणला.


Reactions

Post a Comment

0 Comments