Hot Posts

6/recent/ticker-posts

न.पा.सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ कुर्डूवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.!

 न.पा.सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ कुर्डूवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.!




कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-  येथील नगरपरिषद सत्ताधार्‍यांच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुर्डूवाडी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आधिकाऱ्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला आहे यासाठी व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहेसर्वपक्षीय निवेदनात म्हटल आहे की शासन निर्णयानुसार भुयारी गटारी चे काम पूर्ण करून ठेकेदाराने नगरपरिषदेच्या ताब्यात देऊन सुमारे ३ महिने ही भुयारी गटार रणआऊट करून देणे गरजेचे असताना अजून या भुयारी गटारीचे ओढ्यातील पाईप जोडून मुख्य शुद्धीकरण केंद्र कचरा डेपो येथे हे गटारीचे पाणी प्रवाहित करून शुद्धीकरण झाल्यानंतर रस्त्याची कामे करावीत  या मागणीसाठी नगर परिषदेकडे व उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज स्वरूपात वारंवार तक्रारी करण्यात आलेले आहेत. मात्र या सर्वपक्षीय मागणीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय कुर्डूवाडी बंद ठेवण्यात आली यात व्यापारातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. कुर्डूवाडी शहरातील भुयारी गटारी चे गेल्या ३ वर्षापासून काम चालू असून त्याची मुदत संपून ६ महिने झाले तरी त्यास नगरपरिषदेने मुदतवाढ दिलेली नाही.अशा परिस्थितीत अजूनही काम चालू आहे.गावातील भुयारी गटार पूर्ण झाल्याचे निसर्ग कन्सल्टन्सी या कंपनीने खोटे पत्र देऊन नगरपरिषदेची फसवणूक केलेले आहे तसेच नगर परिषद बांधकाम विभाग कडील पत्रानुसार मुख्याधिकारी कुर्डूवाडी नगरपरिषद यांनी देशमुख अँड कंपनी यांना जिल्हाधिकारी सहआयुक्त नगर विकास शाखा सोलापूर दि.११/०२/२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना याचा संदर्भ देऊन रस्त्याचे काम दत्त मंदिर ते युनियन बँक,महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस लाईन ते मसोबा पार,मसोबा पार ते पंढरपूर नाला या रस्त्यांची कामे करण्यास नगरपरिषदेने पत्र दिले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन उत्तम दर्जाचे कामे करून घ्यावीत अशी मागणी प्रांताधिकारी तथा प्रशासक अधिकारी नगरपरिषद कुर्डूवाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. या बंद साठी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य दत्ताजी गवळी,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने,आकाश जगताप,वसीमभाई मुलांणी,शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमेश पाटील,मिलिंद डिकोळे,सुधीर गाडेकर,आकाश लांडे,फिरोज खान, अतुल फरतडे,राजू शेंबडे,सोमनाथ देवकते,इर्शाद कुरेशी,सागर होनमाने, सागर कोल्हे,अभिजीत सोलंकर,धनाजी कोकरे,विकास इंगोले,दर्शन शर्मा,बंडू टोणपे सह असंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments