Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी भुयारी गटार व रस्ते शासनाच्या नियमानुसार होत नसल्याची तक्रार

 कुर्डूवाडी भुयारी गटार व रस्ते शासनाच्या नियमानुसार होत नसल्याची तक्रार 




योग्य तो निर्णय न घेतल्यास रिपाई चा जन आक्रोश मोर्चा.!


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शहर विकास प्रकल्पा नुसार रेल्वे रुळाच्या पलीकडील भागात भुयारी गटार व रस्ते या शासन नियमा नुसार सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक १ ते ५ मध्ये प्राधान्य देऊन करणे गरजेचे होते. तसे न घडता त्याच्या उलट प्रक्रिया राबवली गेली आहे.या बाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट कुर्डूवाडी शहराच्या वतीने नगरपरिषद कार्यालया वर मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन कुर्डुवाडी नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. वास्तविक पाहता भुयारी गटारीचे काम रेल्वे रुळाच्या पलीकडील म्हणजे प्रभाग क्र-१ मधून सुरू करणे गरजेचे होते तरीसुद्धा सदरचे काम चुकीच्या पद्धतीने उलट दिशेने सुरू केलेले आहे.निवडणुकीच्या वेळेस आपण प्रभाग रचना करताना रुळाच्या पलीकडून करता..मग भुयारी गटारी चे काम आपण उलट दिशेने का सुरू केले ? असा सवाल उपस्थित करत सदरची भुयारी गटारीचे काम करताना आपणाकडून कायदेशीर बाबींचा न विचार करता काळजी घेतलेली नाही.त्यामुळे आपण रुळाच्या पलीकडील नागरिकांना पूर्वीपासूनच आणि सध्याही जाणून-बजून सोयीसुविधांपासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.संपूर्ण शहरासाठी रस्त्याचा डीपीआर मंजूर केला असून आपण रुळाच्या पलीकडील नागरिकांना वंचित ठेवून भुयारी गटारी चे काम अपूर्ण असतानाच भुयारी गटार योजनेतील प्रथम टप्पा मलनिस्सारण प्रक्रियेचे रिसायकलिंग चे काम पूर्ण न करताच सदर काम पूर्ण झाल्यानंतर शासन नियमानुसार ३ महिने तपासणी करणे गरजेचे असतानाच रस्त्याचे काम सुरु करण्याचा घाट काही राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सदर चे मंजूर कुर्डुवाडी शहर रस्ते विकास प्रकल्पानुसार होणारे रस्ते देखील शहर हद्दीतच प्रथम सुरू करणार आहात तसेच मंजूर करण्यात आलेले आहेत.कुर्डुवाडी शहर रस्ते विकास प्रकल्प एकूण ७० कोटीचा असून सदर चे रस्ते संपूर्ण कुर्डूवाडी मध्ये करावयाचे आहेत व त्यामुळे आपण  सदरचे ७० कोटी रुपयांचे कागदोपत्री ताळमेळ लावून गावठाण भागातच वापरणार असल्याचे दिसून येत आहे.सदरचे रस्ते करण्यासाठी शासनाने संपूर्ण न.पा.हद्दीतील रस्ते एकत्रितरित्या करण्यासाठी रक्कम रुपये ७० कोटी मंजूर केले आहेत.यामध्ये सुद्धा काळाबाजार करून सदरचे ७० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न चालवल्याचे निदर्शनास येत आहे.संपूर्ण शहरातील भुयारी गटारी चे काम झाल्यानंतरच रस्ते करणे बाबत शासनाचे आदेश असताना आपण भुयारी गटारी चे अपूर्ण काम असतानाच रस्ते बनवण्याचा केवळ शासनाचे पैसे हडप करण्याचा काही राजकीय पुढार्‍यांना हाताशी धरून घाट घातल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाचे रुळाच्या पलीकडील भागात पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.यावरून असे दिसून येते की दलित मागासवर्गीय नागरिकांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात असल्यानेच दलित मागासवर्गीय नागरिक तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर नागरिकावर सुद्धा अन्याय करून आपण सदरचा भाग हा सोयीसुविधांपासून वंचित ठेवून सदर भाग दुर्लक्षीत करीत आहात अशी आमची धारणा आहे.त्यामुळे विनंती की प्रशासनाने सर्वात प्रथम रुळाच्या पलीकडील भागात म्हणजे प्रभाग क्रमांक १ ते ५ मध्ये गटारीची कामे पूर्ण करावीत तदनंतर एकत्रितरित्या सर्व शहरातील रस्त्यांची कामे करण्यास प्रारंभ करावा डी.पी.आर हा संपूर्ण कुर्डूवाडी शहरासाठी मंजूर असताना व भुयारी गटार सुद्धा संपूर्ण शहरासाठी मंजूर झालेले असताना जाणून बुजून सदरच्या गटारीचे कामाचे २ टप्पे केलेले आहेत व अशा प्रकारची शहरातील कोणत्याही नागरिकांनी व नगरसेवकांनी मागणी २ टप्प्यात करण्याची केलेली नसताना नगरपालिकेचे माजी सत्ताधारी व नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी संगनमत करून भुयारी गटारीचे २ टप्पे पाडलेले आहेत. सदरचे दोन टप्पे करण्यासाठी रेल्वे गेट नंबर ३८ नगरपालिकेने सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी संगनमत करून एकमताने ठराव करून जिल्हाधिकारी व रेल्वे विभागाकडे सदरचे रेल्वे गट बंद करून भुयारी मार्ग करण्यासाठी पत्र दिलेले आहे.त्यामुळे शहराचे २ भाग होऊन शहराची फाळणी होऊन त्याचा उद्योग व व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे.सदरची व्यापारपेठ ही ओसाड पडलेली आहे.मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी पेन्शनर तसेच अनेक नागरिक या भागातील आहेत.रेल्वे गट बंद केल्यामुळे सदर भागातील नागरिक हे शहरात येत नाहीत.त्या मुळे शहरातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे.सध्या कुर्डूवाडी शहरात मागील ३ वर्षापासून भुयारी गटारीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे सदर भुयारी गटार योजना करण्यासाठी आपण सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत.त्यामुळे सर्व शहर हे खड्डेमय होऊन सर्वत्र धुळीचे साम्राज्य माजलेले आहे.रस्त्यातील खड्ड्यांमुळे व धुळीमुळे शारीरिक विकार नागरिकांना जडलेले आहेत.आपण करत असलेले हे सर्व काम नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.त्यामुळे आपणास विनंती की शहरातील भुयारी गटार योजना व रस्ता प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊन पावले उचलावीत अन्यथा मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.सदर मोर्चा दरम्यान होणाऱ्या नुकसानीस आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असे शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांच्या पत्राद्वारे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रति माहितीस्तव नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई विभागीय आयुक्त नगरपरिषद प्रशासन विधान भवन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण विभाग सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास विभाग सोलापूर प्रशासक नगरपरिषद कुर्डूवाडी तथा उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी व पोलीस निरीक्षक कुर्डूवाडी पोलीस स्टेशन यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments