Hot Posts

6/recent/ticker-posts

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- आ. यशवंत माने

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- आ. यशवंत माने


मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च करून हाता तोंडाशी आलेल्या द्राक्ष घडावर किडे,मुंग्या,अळी व किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऑमकोपेस्टीसाइट कंपनी चे किटकनाशक औषध पायरीबॅन डस्ट ची द्राक्ष बागेवर धुरळणी केल्यानंतर द्राक्ष घड सुकणे, करपणे, द्राक्ष वेलीची शेंडे जळणे काड्या दुभागणे तसेच द्राक्ष मणी चिरणे व डाग येणे, असे प्रकार होऊन कोट्यावधी रुपयांचे द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे, त्वरित महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.मोहोळ मतदारसंघातील नुकसान ग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही नुकसान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देवून आमदार यशवंत माने यांनी धीर दिला. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव भागासह मोहोळ विधानसभा मतदारसंघासह येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली, मगरवाडी, विटे, पुळुज भागात या औषधाचा मोठा परिणाम झाला आहे. तरी त्वरित नुकसान भरपाई द्यावी व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यानी आ. यशवंत माने यांच्याकडे केली होती. याची तातडीने दखल घेत आमदार यशवंत माने यांनी शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांचे द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे, त्वरित महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments