Hot Posts

6/recent/ticker-posts

निंमगाव(मा) गावातील महावितरण च्या कार्यालयासमोर संतप्त शेतकर्याचा पाच तास ठिय्या,आंदोलनानंतर लाईट केली सुरु

निंमगाव(मा) गावातील महावितरण च्या कार्यालयासमोर संतप्त   शेतकर्याचा  पाच तास ठिय्या,आंदोलनानंतर लाईट केली  सुरु 




माढा (कटूसत्य वृत्त):- कृषी पंपाचे तोडलेले  विज कनेक्शन तत्परतेने जोडण्यात यावे ही मागणी घेऊन माढा तालुक्यातील निम॔गाव(मा) येथील महावितरण कार्यालयासमोर आक्रमक  शेतकर्यानी  जवळपास  पाच तास ठिय्या आंदोलन केले.शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण ने विद्युत पुरवठा जोडल्यानंतर शेतकर्यानी आंदोलन मागे घेतले.माढा महावितरणचे अधिकारी कैरमकोंडा यांनी आंदोलक शेतकर्याशी चर्चा केली.यावेळी अधिकारी व  शेतकर्यामध्ये जोरदार  शाब्दिक खंडाजंगी  झाली.ज्यानी आता पर्यत विज बील भरलेच नाही अश्यांनी ५ हजार रुपये  तसेच  ज्यांनी या अगोदर बील भरले आहे.त्यांना ३ हजार रुपये भरण्याचा मार्ग काढण्यात आला.यास शेतकर्यानी देखील सहमती दर्शवुन दुपारी अडीच वाजता  आंदोलन मागे घेतले.सोमवारी सकाळी पावणे ९ वाजता निमगाव च्या महावितरण च्या उपकेंद्रासमोर शेतकर्यानी एकत्रित येऊन जोरजोरात घोषणाबाजी करुन प्रवेश द्वारावर जनावरे बांधली होती.जय जवान ..जय किसान च्या घोषणा बाजी देण्यात आल्या.यावेळी निमगाव,राहुलनगर,दारफळ भागातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments