Hot Posts

6/recent/ticker-posts

नेदरलँड येथील फळ तज्ज्ञांची विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाला भेट

 नेदरलँड येथील फळ तज्ज्ञांची विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाला  भेट


माढा (कटूसत्य वृत्त):- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पिक पध्दतीत बदल करुन   वेगळे  प्रयोग शेतात करुन  शेत मालाची विक्री केली तरच शेतकरी समृध्द होईल.कृषी प्रधान भारताचा आदर्श आमच्यापुढे  आहे असे मत  नेदरलँड येथील फळतज्ञ पीटर आवर्करक यांनी व्यक्त केले.निमगाव (टे) (ता.माढा )येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाला नेदरलँड येथील फळतज्ञ पीटर आवर्करक यांनी भेट देऊन निर्यात केंद्राची पाहणी केली. शेतकऱ्यांना निर्यातक्षम  डाळिंब उत्पादन व परदेशातील बाजारपेठ या विषयावरती त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.शेतकर्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आवर्करक यांनी  दिली.यावेळी आयात निर्यात क्षेत्रातील अनुभवी विश्वजीत वाळवेकर तसेच भारतातील डाळिंब,द्राक्ष व भाजीपाला युरोप व अमेरिकेत निर्यात करणार्या संस्थेचे सहयोगी सतीश केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रकल्पाचे चेअरमन ता.प.सदस्य धनराज शिंदे यांनी प्रकल्पांची माहिती देऊन प्रकल्पाचे महत्त्व प्रोजेक्टर द्वारे दिले.यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील,संचालक रवींद्र शिंदे,पोपट खापरे,विलास देशमुख,महेश मारकड,महेश डोके,माढा वेल्फेअरचे संचालक आनंद पानबुडे आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments