आकाश नाईकवाडी यांची पोलिस उपनिरीक्षक निवड
सुयश दूध संकलन केंद्र व श्रीहरी वाचनालय तसेच ग्रामस्थच्या वतीने सत्कार करण्यात आला
वडाचीवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील आकाश बळीराम नाईकवाडी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करीत त्याची पोलिस उपनिरीक्षक निवड झाली आहे. दरम्यान निवडीबद्दल सुयश दूध उद्योग, श्रीहरी वाचनालय व ग्रामस्थ मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. येथील छोट्याशा गावातून सामान्य परिस्थिती मधून संघर्ष करीत आकाश बळीराम नाईकवाडी या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून परिश्रम घेऊन उज्वल यश संपादन करीत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचा सन्मान गावातील ग्रामस्थ, सुयश दूध संकलन केंद्र व श्रीहरी वाचनालय मार्फत पांडुरंग सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आला. व पारंपरिक वाद्यासह गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. कोरोना सारख्या कालावधीत परिश्रम घेऊन परिस्थितीवर मात करून आकाश नाईकवाडी यांनी मिळवलेले यश हे गावातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असल्याचे मत आदर्श शिक्षक राजेंद्र सरवदे यांनी व्यक्त केले. तर गावातील अनेकांची प्रेरणा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवले, यासह कोरोना कालावधीत छोट्याशा गावात सुद्धा श्रीहरी वाचनालयातून अभ्यास आवश्यक पुस्तकांची उपलब्धता झाली, यामुळे यश मिळवता आल्याची भावना आकाश नाईकवाडी यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केली. यावेळी नेताजी सुरवसे, बळीराम नाईकवाडी, रामेश्वर सुरवसे, अशोक बचुटे, दत्तात्रय डोंगरे, अभिमान डोंगरे, आदेश नाईकवाडी, सौरभ सुरवसे, सुहास म्हमाने, अशोक लोंढे, सिध्देश्वर म्हमाणे, बळीराम डोंगरे, गोविंद केदार, उमेश नाईकवाडी, दत्तात्रय नाईकवाडी, शरद म्हमाणे, नामदेव तुपे, सुधीर पुळजे, कैलास तोडकर, चंद्रकांत म्हमाणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments