सोशल बँकेच्या सभासंदाना आर्थिक मदत, सेवकांचा आरोग्य विमा तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अॅड.यु.एन.बेरिया
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दि सोलापूर सोशल अर्बन को-ऑप बँकेच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना हृदय रोग, किडणी, मेंदु संदर्भातील आजार, अर्धांगवायु, नेत्र शस्त्रक्रीया तसेच अपघात झाल्यानंतर होणाऱ्या शस्त्रक्रिया तथा औषधोपचारासाठी तीन हजार रुपयांचे सहाय्य दिले जाणार आहे. बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचायांचा आरोग्य विमा उतरविणार आहोत. वैद्यकीय उपचारासाठी बँकेच्या ३२०० सभासदांना आर्थिक मदत मिळणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भागधारकांच्या कल्याण निधीतुन सभासदांना आर्थिक मदत तर कर्मचारी कल्याण निधीतुन सेवकांचा विमा उतरविण्यात येणार आहे. याशिवाय दहावी व बारावी परीक्षेत प्रथम श्रेणी अथवा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या बँकेचे सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहनपर दरवर्षी बक्षिसे देऊन गौरविणे, दोन गरीब, गरजु, होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शुल्कापोटी दरवर्षी २५ हजार रुपयांचे सहाय्य देणे तसेच सक्रीय सभासदांना भेटवस्तु देण्याचाही निर्णय घेण्यात आला. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका काढण्यात येणार असुन सभासद व ग्राहकांचा मेळावा ही आयोजित केला जाणार आहे. सोशल अर्बन बँक गेली ५० वर्षे सोलापूर शहरात कार्यरत असुन या माध्यमातुन स्वयंरोजगार वाढविण्याच्या दृष्टीने अनेक असंख्य छोटे-मोठे उद्योजक, व्यापाऱ्यांना कर्जरूपी मदत करुन त्यांचा आर्थिक विकास घडविण्यात बँकेने वाटा उचलला आहे. बँकेचे संपूर्ण कामकाज संगणकीय प्रणालीने होत असुन बँकेस उत्तम व पारदर्शक कारभाराबद्दल लेखा परीक्षणात गेली अनेक वर्षे अ वर्ग मिळत आहे. बँक सतत नफ्यात असुन आजतागायत कधी हि तोटा झाला नाही.पत्रकार परिषदेस रजाक नाडीवाले, शकी कॅप्टन ,मैनोद्दीन शेख, नसीर खलिफा ,बापू मेलगिरी, नाझिया मुलाणी, प्रभारी मॅनेजर इरशाद शेख आदी उपस्थित होते.
0 Comments