Hot Posts

6/recent/ticker-posts

पनवेल येथील भव्य अधिवेशन व शिक्षण परिषदेसाठी सोलापूर जिल्हयातून पाच हजार पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षा जाणार.

 पनवेल येथील भव्य अधिवेशन व शिक्षण परिषदेसाठी सोलापूर जिल्हयातून पाच हजार पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षा जाणार

                                                

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिनांक १८/०३/२०२२ शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक नेतेसंभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा स्पोर्टर्स अॅकॅडमी पनवेल येथे भव्य अधिवेशन व शिक्षण परिषदेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केले आहे. या भव्य अधिवेशन व शिक्षण परिषदेस सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष म.ज. मोरे व सरचिटणीस बब्रुवान काशीद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हयातून पाच हजार पेक्षा जास्त जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक जाणार आहेत, असे जिल्हा शिक्षक संघाचे प्रवक्ते संजय सावंत यांनी कळविले आहे. या शिक्षण परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंतराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री  वर्षाताई गायकवाड, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात, गृहमंत्री  दिलीपराव वळसे-पाटील, पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चु कडू ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे, रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री  सतेज पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मा.खासदार सुनिल तटकरे,  खासदार श्रीरंग बारण, आमदार रोहितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. व तसेच या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षक आमदार बाळाराम पाटील काम पाहणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील सर्वांत बलाढय व शक्तीशाली संघटना आहे. आता पर्यंत या संघटनेला आचार्य दोंदे, आचार्य अत्रे अशा थोर मान्यवरांची परंपरा लाभलेली आहे. आणि आतापर्यंत शिक्षकांची प्रलंबीत प्रश्न शिक्षक अधिवेशनात मांडून व्यासपिठावरच संबंधित ग्रामविकास मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक करुन घेणे हा राज्य शिक्षक संघाचा आजतागायत इतिहास आहे. या अधिवेशनामध्ये इतर दोन राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुध्दा जुनी पेन्शन योजना शासन सुरु करणार का ? याची उत्सुकता सोलापूर सह सर्व जिल्हयांतील प्राथमिक शिक्षकांना लागून राहिली आहे.या अधिवेशनासाठी सोलापूर जिल्हयातून राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष म.ज. मोरे, सरचिटणीस बब्रुवान काशीद, न.पा.- म.न.पा.चे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, सोलापूर जिल्हा प्रथमिक सोसायटीचे उपाध्यक्ष राम इंगळे, महिला आघाडी प्रमुख चंदाराणी आतकर मॅडम, कार्याध्यक्ष जोतीराम बोंगे, कोषाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, प्रवक्ते संजय सावंत, प्रसिध्दी प्रमुख बापूसाहेब पाटील, सल्लागार मंडळाचे राज्याध्यक्ष लहू कांबळे, राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे संघटना दिलीप ताटे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र वायसे, राज्य उपाध्यक्ष नागनाथ साठे, राज्य प्रतिनिधी नागनाथ क्षिरसागर, शिक्षक नेते तात्यासाहेब यादव, महिला प्रतिनिधी प्रिया सहस्त्रबुध्दे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सिता नामवार, संजय काशीद, लक्ष्मीकांत तळवार, प्रशांत रजपूत, मनोज गादेकर,अशोक पवार,मल्लिकार्जुन सोमेश्वर, गणेश खांडेकर, लक्ष्मण घुले, राजेश वाणे, गंगाधर कांबळे, एकनाथ भालेराव यांच्या सह प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, सरचिटणीस व जिल्हा व तालुका शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक मोठया संख्येने पनवेल येथे होणाऱ्या भव्य अधिवेशन व शिक्षण परिषदेसाठी जाणार आहेत.या वेळी संजय सावंत,राम इंगळे,बापूसाहेब पाटील उपस्तिथ होते.   



Reactions

Post a Comment

0 Comments