Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तळे हिप्परगा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी होण्याची मागणी

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने  तळे हिप्परगा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी होण्याची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तळे हिप्परगा ग्रामपंचायत मध्ये सन 2015 ते 2020 या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याकारणाने त्याची रितसर चौकशी व्हावी व गावाला न्याय मिळावा या संदर्भात क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष किसन पाटोळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. सुरेश आप्पा पाटोळे,  सचिन उडानशिवे, अतिश पाटोळे, दिनेश पाटोळे ,आकाश पाटोळे, अमोल बोराडे , वसंत बोराडे, मदन भालेराव या संघटनेतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

       गेल्या पाच वर्षात सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनामार्फत आलेल्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबतचा लेखापरीक्षण अहवाल पाहून निपक्ष अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी. गौन खानिज साठी शासनाकडून येणारा निधी, १४ व्या वित्त आयोगाचा निधी व घरपट्टीच्या माध्यमातून जमा होणारा निधी यामध्येही तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी चुकीच्या व बेकायदेशीर मार्गाने अपहार केला आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा व गट विकास अधिकारी पंचायत समिती सोलापूर यांना चौकशीचे आदेश देऊन सुद्धा आदेश पत्रानुसार कामकाज न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची तसेच निलंबनाची कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले. 

Reactions

Post a Comment

0 Comments