प्रदूषणमुक्त वाहन कायनेटिक ग्रीन सोलापूर जिल्ह्याचे वितरक नीदा इव्ही या होटगी रोड येथील शोरूमचे थाटात उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतातील नामवंत कायनेटिक ग्रीन या कंपनीने प्रदूषण मुक्त इलेक्ट्रॉनिक वाहन बाजारात आणले आहे. या इलेक्ट्रिक वाहन निदा इव्ही या होटगी रोड येथील शोरूमचे उद्घाटन सोमवारी संध्याकाळी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनंजय पांडे, ट्राफिक पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, प्रिसिजन कॅमशाफ्ट फाउंडेशनच्या चेअरमन डॉ. सुहासिनी शहा,सदर बजार पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी भोसले,किलोस्कर फेरसचे जनरल मॅनेजर गोखले,माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी निदा इव्हीचे वितरक सलीम हुंडेकरी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त टू व्हीलर,थ्री व्हीलर इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे वैशिष्ट्ये विशद केली.
सदर वाहन सोलापुरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून सोलापूर महानगरपालिका पुढील काळात या वाहनाच्या चार्जिंग साठी मोफत चार्जिंग स्टेशन उभे करणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी सांगितले.
या इलेक्ट्रॉनिक वाहनामुळे अत्यंत गतीने जाणाऱ्या युवकांच्या ट्रॅफिकला आळा बसणार असून सदर वाहन खर्चिक नसल्याने पेट्रोलच्या खर्चात बचत होणार आहे, खास करून महिला विद्यार्थी युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर वाहन अत्यंत सुरक्षित असल्याचे पोलीस उपायुक्त दीपक आर्वे साहेबांनी यावेळी नमूद केले. हे वाहन किफायतशीर, सुरक्षित व अत्यंत मजबूत असून सर्वांनी सदर वाहन खरेदी करावे असे आवाहन सदर बजार पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मा.अश्विनी भोसले यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या विभागातील नामवंतांनी व पर्यावरण प्रेमींनी सदर शोरूम च्या उद्घाटनाबद्दल वितरकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 Comments