छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडचे अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या 333 व्या बलिदान दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. अनेक लढाय्या जिंकल्या. मात्र त्यांचे स्वराज्यप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि शौर्य हे त्यांच्या शेवटच्या दिवसातून अधिक ठळकपणे दिसून येते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होवूनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले अरविंद शेळके उपाध्यक्ष सिताराम बाबर महेश माने मल्लू भंडारी गजानन शिंदे संजय भोसले रमेश जाधव नागेश पवार अमोल सावंत ईत्यादी उपस्थित होते.
0 Comments