Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्ताफ शेख दिग्दर्शित "धारावी कट्टा" तीन भाषांमध्ये चित्रपट लवकरच झळकणार

 अल्ताफ शेख दिग्दर्शित "धारावी कट्टा" तीन भाषांमध्ये चित्रपट लवकरच झळकणार 


तीन भाषेत येणारा बिग बजेट धारावी कट्टा या चित्रपटाचे पोस्टर व टीझर उद्घाटन सोहळा चिंचवड येथे थाटात संपन्न झाला

मुंबई (कटूसत्य वृत्त):- दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई क्रिऐशन इंटरटेनमेंट व ओरीजनल प्राईम पिक्चर ५ प्रस्तुत, निर्माता मिथलेश अग्रवाल, केतन जाधव, आणि सफर शेख, प्राईम पिक्चर ५ चैनल क्रिएटीव्ह हेड मयूर कुलकर्णी व लेखक दिग्दर्शक अलताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या चित्रपटाचे पोस्टर उद्घाटन सोहळा चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात संपन्न झाला. चुकीच्या वेळी चुकीच्या जागी अडकलेल्या ४ मुलांचा जीवन संघर्ष धारावी कट्टा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. अश्या या धारावी कटाच्या पोस्टर चे उद्घाटन हे VNWC  या ग्रुप च्या चेअरमन  सौ. बॉबी करनानी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 


लेखक दिग्दर्शक अलताफ दादासाहेब शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून या अगोदर चार सुपर हिट चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ हिंदू मुस्लीम एक्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद ही वल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार ही मिळालेले आहेत. आज धारावी कट्टा या त्यांच्या ५ व्या चित्रपटाचे पोस्टर व ट्रेझर उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भा.ज.पा आमदार महेश दादा लांडगे, साई डेव्हलपर्स चे प्रमुख व भा.ज.पा अनुसूचित मोर्चा चे उपाध्यक्ष विलासभाऊ शिंदे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नीलम जाधव, फिरोज खान, सिनिअर पोलीस ईन्स्पेक्टर बाप्पू कुतवल, डॉ. मदन कोठुले. ई उपस्थित होते. 

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श सरपंच चिदानंद स्वामी सर,  सुभान आली शेख इंडियन नेव्ही, समीर शेख सॉफ्टवेअर इंजिनीयर, अमजदखान शेख, पौर्णिमा लुनावत, प्रीती भट्टी  पाटील, मनोज पिंगळे ऑलिम्पियन बॉक्सर, गोपाल देवांग आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध व अर्जुनी अवॉर्ड व द्रोणाचार्य अॅवॉर्ड विजेता  , बापू आप्पा दुरई, आकाश शिंदे योगेश भाऊ लांडगे, विजय भाऊ घोडके, गणेश भाऊ साने ई उपस्थित होते.

तसेच फिरोज खान यांनी धारावी कट्टा चित्रपटाच्या पोस्टर उद्घाटन सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य व योगदान दिल्या बद्दल लेखक दिग्दर्शक अलताफ दादासाहेब शेख यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी धारावी कट्टा ची संपूर्ण टीम, महाराष्ट्र न्यूज मराठी ची संपूर्ण टीम, व प्राईम पिक्चर ५ ची संपूर्ण टीमचे ही विशेष सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments