Hot Posts

6/recent/ticker-posts

कदमांच्या कादंबऱ्यांवर शनिवारी सोलापुरात चर्चासत्र

कदमांच्या  कादंबऱ्यांवर शनिवारी सोलापुरात चर्चासत्र
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'महेंद्र कदम यांचे कादंबरी लेखन' या विषयावर  शनिवार दि. १९ मार्चला सायंकाळी पाच वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 
या चर्चासत्राचे उदघाटन विद्यापीठाच्या  कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस करणार आहेत. या चर्चासत्रासाठी बीजभाषक म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, कुलसचिव डॉ. सुरेश पवार, भाषा व वाड्.मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या चर्चासत्राचे उदघाटन होणार आहे. चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात डॉ. केदार काळवणे, डॉ. रफिक सुरज, डॉ. राजशेखर शिंदे यांची भाषणे होणार आहेत. नानासाहेब गव्हाणे, प्रा. सारीपुत्र तुपेरे आणि प्रा. रमेश शिंदे चर्चेत सहभागी होणार आहेत.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात लेखक महेंद्र कदम यांची मुलाखत डॉ. राजेंद्र दास आणि डॉ. स्मिता पाटील घेणार आहेत. 
महेंद्र कदम हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांच्या धूळपावलं, आगळ, तणस या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत. आगळ कादंबरीतील काही भाग दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. महेंद्र कदम यांच्या कादंबऱ्यांना विविध वाङ्मय पुरस्कार यांनी सन्मानित केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या लेखकाचे कादंबरी या साहित्यप्रकारातील योगदान अधोरेखित करण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 
सर्व साहित्य प्रेमी आणि श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन भाषा व वाड्.मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments