काश्मीर समस्या ?? विवेचन
काही वर्षांपूर्वी काश्मीर मधून राजकीय फायद्याच्या दृष्टीने तेथील काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून बाहेर पडायला भाग पाडले होते असे म्हणतात. ही जबाबदारी विशिष्ट राजकीय पक्षाने व विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संघटनेने पार पाडली होती. अर्थातच त्यासाठी परंपरागत धार्मिक वाद निर्माण केला होता असे दिसते. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी सकारात्मक पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तसे होऊ दिले नाही. काश्मीर राज्य म्हणजे प्रामुख्याने काश्मीर व्हॅली जगभर एक उत्तम नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सुमारे पाच-सहा हजार वर्षांपासून काश्मीर परिसरात आदिवासी बहुल भटके विमुक्तगुजर पशुपालक शेतकरी समाज राहत होता . हेच लोक तसे मूळचे काश्मिरी निवासी होते . पुढे आक्रमक अविवेकी आर्य आक्रमण झाले काश्मीरमध्ये असलेल्या सुखदायक, आनंददायी नैसर्गिक वातावरणाचे आकर्षणामुळे वैदिक धर्मीय ब्राह्मण समाजातील आक्रमक अविवेकी आर्यांनी मूळ निवासी काश्मिरी लोकांना हाकलून लावले. त्यांच्या जमीनी वसाहती ताब्यात घेतल्या. म्हणजेच काश्मीरमध्ये आजचे काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट राजोपाध्ये म्हणून ओळखले जाणारे सर्व काश्मिरी ब्राह्मण हेच मूळात घुसखोर आहेत. काश्मीर प्रदेश हा पूर्वी पूर्णपणे अब्राह्मणी पशुपालक समुहांच्या वसाहतींचा प्रदेश होता. अडीच तीन हजार वर्षांपूर्वी ह्या भागात शिव चार्वाक जैन बौद्ध विचारांचे प्राबल्य होते . त्यांच्या विरोधात वैदिक धर्मीय ब्राह्मण एकत्रित येऊन वाद सुरू केले होते. यात ब्राह्मण शक्तीचा विजय झाला होता . काश्मीरमधील बौद्धांना हाकलून लावण्यासाठी शंकराचार्य श्रीनगरमध्ये दाखल झाले होते..आजही श्रीनगरमध्ये असलेल्या शंकराचार्य टेकडीवर हा इतिहास सांगितला जातो . अशा रीतीने काश्मीरमधील मूळ मालक निवासी बौद्ध बांधवांना आक्रमक घुसखोर ब्राह्मणांनी श्मिरमधून बाहेर पिटाळून लावले होते .. आजच्या लेह लडाख भागात बौद्ध बांधवांना आश्रय घ्यावा लागला होता. म्हणजेच काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट हेच काश्मीरमध्ये घुसखोरी करून आलेले आहेत .. असे भारतीय प्राचीन काळापासून इतिहासातील सत्य आहे .. सातव्या शतकात अरबस्तानात इस्लाम धर्म स्थापन झाला .आणि सन ६६४ दरम्यान भारतीय वायव्य सरहद्दीवर पहिले मुस्लिम आक्रमण झाले . त्यांना मदत करण्याचे काम येथील घुसखोर काश्मिरी ब्राह्मणांनी केले होते असे म्हटले जाते. सन ७१२ मध्ये तर राज्यकर्ते ब्राह्मण दाहेर बंधू होते . त्यापैकी एका भावाने इस्लाम धर्म स्वीकारला होता .तर दुसऱ्याने मुस्लिम आक्रमकांना मदत केली होती असे इतिहासकार मानतात. मोहम्मद बिन कासिम असाच सन्मानाने भारतात आला होता. त्याकाळी उत्तरेत सिंधु वायव्य भागात काश्मिरी पंडितांच्या वसाहती स्थापन झालेल्या होत्या. आक्रमक मुस्लिम व काश्मिरी पंडित यांनी आपण दोघे भाऊ भाऊ ही भूमिका घेतली होती अशा रीतीने काही शतके आक्रमक मुस्लिम व आक्रमक काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट आपसात सलोख्याने व बंधुभाव जपत एकत्रित येऊन राहत होते . सर्व सामाजिक संबंध जतन करत असताना दिसतात . दहाव्या अकराव्या शतकात इतर मुस्लिम अफगाणी इराणी इराकी तुर्की अशी आक्रमणे सुरू झाली होती. अशा वेळी सरहद्दीवर असल्याने काश्मिरी पंडितांनी बचावात्मक पवित्रा घेऊन मुस्लिम आक्रमकांना जमेल तसे जास्तीत जास्त सहकार्य केले होते.सुमारे पंधराव्या शतकापर्यंत हेच संबंध टिकून राहीले होते दोघेही आक्रमक घुसखोर असल्याने अनेक वर्षे काश्मिरी ब्राह्मण ...काश्मिरी मुस्लिम भाई भाई हे सूत्र टिकून राहिले होते. काही वाद निर्माण झाला तर ब्राह्मण हेच प्रथम आक्रमक असल्याने त्यांची बाजू बळकट होत गेली होती... अशा प्रकारे काश्मिरी पंडित शिरजोर होत गेले होते असे लक्षात येते..या परिस्थितीत सन १५२६ मध्ये पहिले पानीपत युद्ध झाले.आणि भारतीय भूमीवर मोगल सम्राटांनी आपले राज्य स्थापन केले होते.दिल्लीतील उन्हाळा सहन होत नसल्याने मोगल बादशहा शिमला काश्मीरमध्ये उन्हाळ्यात राजधानी हलवत होते काश्मीरमधील काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट यांनी मोगलांशी संगत पंगत अंगत अशी सर्व प्रकारची जवळीक साधली होती मोगलांच्या फौजा व सरदार कामदार यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काश्मिरी पंडित पुढे आले.जवळकीतून एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले.सत्ताधारी मोगलांच्या विश्वासात राहण्यासाठी काही मतलबी काश्मिरी पंडितांनी स्वेच्छेनेच धर्मांतर करून मुस्लीम इस्लाम धर्म स्वीकारला होता.अशा प्रकारे काश्मिरी पंडित धर्मांतरित मुस्लिम होऊन तर काही मूळचे पंडित राहून मोगलांच्या सेवेत दाखल झाले होते.धर्मांतरित मुसलमान काश्मिरी पंडितांना मोगलशाहीत मानसन्मान व अधिकारी पदे मिळू लागले होते.ह्या कारणाने जास्तीत जास्त काश्मिरी पंडित ब्राह्मण लोक स्वेच्छेने मुस्लिम होऊ लागले होते संस्कृत भाषा शिवाय फारसी शिकू लागले.अशा प्रकारे काश्मिरमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढत गेली . यात केवळ काश्मिरी पंडित यांनीच धर्मांतर केले होते.सामान्य बहुजन हिंदू समाज, आदिवासी,भटके विमुक्त पशुपालक आपापल्या धर्मात राहिले कारण धर्मांतर हे सक्तिचे नव्हते. आजच्या पीओकेसह भारतीय काश्मीरमध्ये असलेले सर्वच मुसलमान हे मूळचे काश्मिरी पंडितच आहेत.आजही त्यांची कुळनावे एकच आहेत. भारताचे पहिले.प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मिरी पंडित कौल कुळातील होते. श्रीनगरमध्ये मोगलांच्या सेवेत असताना त्यांचे पूर्वज मोगलांच्या सोबत दिल्लीत आले होते.असे म्हणतात त्यांना राहण्यासाठी एका कालव्याच्या जवळ घर दिले होते. कालवा म्हणजे नहर. नहर जवळचे घरवाले म्हणता म्हणता नेहरू झाले होते. नेहरुंच्या काही नातेवाईकांनी सुद्धा इस्लाम धर्म स्वीकारला होता. जवळपास सन १८६० पर्यंत हीच प्रक्रिया सुरू होती. याबद्दल कोणालाही आक्षेप नव्हता . तोपर्यंत धर्मांतरित मुस्लिम व मूळचे काश्मिरी पंडित यांच्यात सर्वच प्रकारचे सौख्य संबंध होते . मुस्लिम बांधवांनी आपल्या धर्माचे प्रार्थनास्थळे सरसकट निर्माण केले होते अनेक कुटुंबांमध्ये एकाचवेळी काही सदस्य मुस्लिम तर काही सदस्य वैदिक धर्मीय ब्राह्मण पंडित होते असे निदर्शनास येते .. घरात व गावात एच वेळी एकीकडे मुस्लिम प्रार्थना तर दुसरीकडे वेदिक ब्राह्मणी प्रार्थना होत होती . ह्यामुळे पुढील काळात काश्मिर सह उत्तर भारतातील अनेक प्रार्थनास्थळे आपसात वाटली गेली. अर्थातच ही वाटणी सामोपचाराने झाली होती असे मानले जाते. त्याच वेळी अन्य बहुजन समाजातील गुजर, बौद्ध, राजपूत, जाट, घडामोडींमुळे अस्वस्थ झाले. अनेकांनी बाहेर पडत नवीन वसाहती स्थापन केल्या आहेत. यामुळे काश्मिरी पंडित मोठ्या संख्येने मालक.शिख या बनले. इंग्रजांचे राज्य स्थापन झाले होते. काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट यांनी इंग्रजांची सेवा सुरू केली होती. राजकीय भाग म्हणून इंग्रजांनी काश्मिरी पंडित विरुद्ध काश्मिरी मुसलमान वाद सुरू केले. मोगली सत्ता नामशेष झाली होती. आता पुढे मुस्लिम राजवट स्थापन होण्याची सुतराम शक्यता नव्हती . यातूनच काश्मिरी वैदिक धर्मीय ब्राह्मण पंडित पुरोहित भटजी भट यांनी इंग्रजांशी जवळिक निर्माण केली . आणि काश्मिरी पंडित इंग्रजांच्या सेवा करण्यात रमले. काश्मीरमध्ये असलेल्या इंग्रजी राजसत्तेचा फायदा घेऊन काश्मिरी पंडितांनी धर्मांतरित मुस्लिम पंडितांना वेगवेगळे आव्हान दिले होते. पुढे काळमानानुसार आपसातील मतभेद भांडणे वाढत गेले .... आणि यातूनच पुढे पाकिस्तान नवे राष्ट्र म्हणून उदयास आले होते . हा आधुनिक इतिहास आहे. भारतीय समाजातील धर्मांतरित मुसलमान वेदिक ब्राह्मण धर्माचेआहेत. तसेच इतर बहुजन समाजातील ही आहेत. धर्मांतरित ब्राह्मण मुसलमान अश्रफी म्हणजे वरचे श्रेष्ठ व बहुजन मुसलमान अजलफी म्हणजे खालचे हलके नावाने ओळखले जातात.आजच्या पाकिस्तानसह, पिओके व काश्मीरमध्ये असलेले मुस्लिम समाजातील जास्तीत जास्त मुसलमान बांधव हे मूळचे काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट आहेत . तर बांगलादेश मधील बहुसंख्य मुस्लिम बहुजन समाजातील आहेत . नुकतेच आर एस एस ने कायदे आझम बॅरिस्टर जिना यांचे चित्र मूळचे राष्ट्रवादी म्हणून लावले आहे.तर मूळचे काश्मिरी पंडित मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले -- सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान ह्याला -- हे गित मोहम्मद इक्बाल पाकिस्तान मध्ये गेले तरी वाजवले जाते . यातूनच आजच्या भारतीय युवकांनी योग्य संदेश घेऊन आपापल्या परीने नव्याने भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून समतावादी मानवतावादी विवेकवादी भूमीकेतून राष्ट्रवाद मानला व मांडला पाहिजे अशी अपेक्षा व विनंती आहे .. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी एकत्रित काश्मीरमध्ये धर्मांतरित काश्मिरी पंडित , वेदिक काश्मिरी पंडित तसेच बहुजन हिंदू गुजर, जाट , राजपूत , मराठा व शिख , अन्य पशुपालक राहत होते . ते आजही तेथेच आहेत . पाकिस्तान निर्मिती केली तेंव्हा राजा हरिसिंग द्विधा मनःस्थितीत होते . काश्मीरमध्ये बहुसंख्य लोक मुसलमान होतेयाचाच गैरफायदा घेत भारतीय आर एस एस , पाकिस्तान व इंग्रज यांनी काश्मीरमधील अनिश्चित सामाजिक वातावरणातून "" काश्मिरी पंडित "" धोक्यात आले आहेत असे वातावरण निर्माण केले आहे धर्मांतरित काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट मुस्लिमांनी काश्मीर सोडून बाहेर पडावे. आणि त्यांची सर्व चल अचल संपत्ती आजच्या काश्मिरी पंडितांना परत करावी , हीच मूळ छुपी मागणी आहे.धर्मांतरित काश्मिरी मुस्लिम पंडित लोकसंख्या जास्त आहे . तर काश्मिरी पंडित लोकसंख्या कमी आहे.हिंदू महासभेचे नेते शामा प्रसाद मुखर्जी यांनी काश्मिरात जाऊन हा विषय सरसकट धार्मिक केला होता.तेंव्हापासून तो सतत धगधगत ठेवला आहे असे लक्षात येते . काश्मीरमध्ये लडाख विभाग बौध्द धर्मीय,काश्मिर काश्मिरी पंडित व धर्मांतरित पंडित तर जम्मू हिंदू धर्मीय लोकांनी व्यापलेलाआहे.याचा अर्थ असा नाही की काश्मीरमध्ये हिंदू शिख बौद्ध धर्म मानणारे लोक राहत नाहीत.असे असतानाही काश्मीरमध्ये आर एस एस ची भूमिका हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नाही . तर काश्मिरी पंडित विरुद्ध काश्मिरी मुसलमान पंडित अशी आहे.कलम ३७० हटवून तीन वर्षे होत आहेत. खास बदल झाला नाही. आर एस एस ने ह्या वादाला खतपाणी घालत जीवंत ठेवला आहे. अर्थातच ही सर्व माहिती परिस्थिती सदृश्य आहे . तेथील आर्मी रूल मुळे बरेचसे सत्य बाहेर येत नाही . पण सध्या चित्रपट वा तत्सम इतर काही कारणांमुळे हा विषय जाणिवपूर्वक राजकीय फायदा मिळण्यासाठी चिघळायला सुरुवात केली आहे असे म्हणायला हरकत नाही .. यावरून एक गोष्ट लक्षात येते की काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट हे हिंदू धर्माचे नाहीत . किंवा काश्मीरमध्ये हिंदू मुसलमान हा वाद राजकारणात यशस्वी होत नसावा .... थोडक्यात काश्मिरमधील वाद हा पूर्णपणे-- धर्मांतरित काश्मिरी मुसलमान पंडित पुरोहित भटजी भट विरुद्ध मूळ काश्मिरी पंडित पुरोहित भटजी भट " हाच एकमेव आहे हे निश्चित ...
पुरुषोत्तम खेडेकर चिखली.
मोबाईल --९८२३६९३२२७ .
0 Comments