Hot Posts

6/recent/ticker-posts

आढेगाव येथे डांबर काढून घेण्याचे बेकायदेशीर कृत्य करत असताना शेजारचे गोडऊन पेटले

 आढेगाव येथे डांबर काढून घेण्याचे बेकायदेशीर कृत्य   करत असताना शेजारचे गोडऊन पेटले





 तीस लाख रु.चे नुकसान.... आढेगाव येथील प्रकार...                  

टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- डांबराच्या टँकरमधून घट्ट असलेल्या डांबर बेकायदेशीरपणे काढून घेऊन  ते पातळ करण्यासाठी पेटवलेल्या आगीच्या ठिणग्या शेजारीच असलेल्या गोडाउन मध्ये गेल्यामुळे गोडाऊनला आग लागून किमान 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, ही घटना गुरुवारी, 17 मार्च रोजी दुपारी एक ते दोन च्या दरम्यान कोंढार भागातील आढेगाव तालुका माढा  येथे घडली आहे. सविस्तर वृत्तांत असा की मौजे आढेगाव तालुका माढा येथे सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नागनाथ दत्तू चव्हाण व अजय नागनाथ चव्हाण यांचे त्यांच्या मालकीच्या गट नंबर 104 मध्ये 33 फूट लांब व 33 फूट रुंद असे  मोठे गोडाऊन आहे. त्यांनी हे गोडाऊ बारामती (भवानीनगर) येथील परदेशी केळी निर्यात करणारे व्यापारी विजय फाळके यांना भाड्याने दिलेले असून या गोडाऊन मध्ये फाळके यांच्या मालकीचे नऊ जनरेटर संच, लाखो पॉलिथिन बॅग व केळी पॅक करून परदेशात पाठवणे योग्य असे खास तयार करून घेतलेले उच्चप्रतीचे बॉक्स व तसेच त्यांच्या मजुरांचे थोडे प्रापंचिक सामान, गॅस सिलेंडर, भांडी असे एकूण 20 ते 25 लाख रुपयांचे सामान होते.आढेगाव येथील अमोल विठ्ठल चव्हाण व विठ्ठल दत्तू चव्हाण यांनी टँकर नंबर एम एच 45 ए एफ् 5268 व दुसरा टॅंकर mh45 ए् ए्फ 4691 असे दोन टँकर गोडाऊन च्या बाजूला आणून उभे केले होते. यातील टॅंकर नंबर 5268 मध्ये असलेले घट्ट डांबर  काढून ते दुसरा टॅंकर नंबर 4691 मध्ये भरण्याचे बेकायदेशीर काम चालू होते, परंतु घट्ट डांबर पातळ करणे आवश्यक असल्यामुळे, जमिनीलगत खालील बाजूस जाळ पेटवला होता. या वेळी गोडाउन मध्ये राहणारे मजूर केळी खरेदीसाठी परिसरातील अन्य ठिकाणी गेले होते व गोडाऊन च्या शटरला कुलूप होते. डांबर काढण्याची  प्रक्रिया चालू असताना आगीच्या ठिणग्यामुळे गोडाऊन च्या कडेला असलेल्या वाढलेल्या गवत कचऱ्याने पेट घेतला व बंद गोडाऊन  शटर च्या आत लहान जागेतून ठिणग्या आत गेल्या व आतील सामानाने पेट घेतला व कांही क्षणात गोडाऊनच्या खिडक्यांमधून धूर आणि ज्वाळा झेपावताना सर्वत्र दिसू लागल्या., हे भयावह दृश्य रस्त्याने जाणारे अनेक नागरिक पाहत होते.  
आपला सख्खा भाऊ नागनाथ दत्तू चव्हाण यांचे गोडाऊन आपल्याच बेकायदेशीरपणे डांबर काढण्याच्या उद्योगामुळे पेटलेले दिसताच विठ्ठल चव्हाण व अमोल चव्हाण यांनी दोन्ही टँकर नंबर 5268 व  4691 वेगाने घाई करून बाजूला घेतले व राष्ट्रीय महामार्गाने इंदापूर च्या दिशेने पळवले हे सर्व येथील नागरिकांनी पाहिले आहे. असे बेकायदेशीर चोरीचे प्रकार हे दोघे पीता-पुत्र वारंवार करत असल्याचे येथील नागरिकातून बोलले जाते. या आगीमध्ये नागनाथ चव्हाण यांच्या गोडाऊन चे किमान  दहा लाखाचे नुकसान झाले आहे तर आत मध्ये असलेल्या  सामानाचे मालक भाडेकरू विजय फाळके, बारामती यांचे किमान 20 ते 25 लाख रुपयाचे सर्व सामान जळून खाक होऊन नुकसान झाले आहे, एकूण नुकसानीचा आकडा अंदाजे 25 ते 30 लाख रुपयापर्यंत आहे. नागनाथ चव्हाण व विजय फाळके यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दाखल केली असून टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक राजेश निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल शिंदे व काशीद अधिक तपास करत आहेत .


Reactions

Post a Comment

0 Comments