Hot Posts

6/recent/ticker-posts

आता दुध संघ करणार ग्राहकांना दुध घरपोच; दिल्लीच्या मदर डेअरीच अनुकरण

आता दुध संघ करणार ग्राहकांना दुध घरपोच; दिल्लीच्या मदर डेअरीच अनुकरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सहकारी दुध संघाची बैठक गुरुवारी सोलापूर येथील प्रधान कार्यालयात नूतन चेअरमन रणजितसिंह शिंदे (सदस्य, जि.प. सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
यावेळी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ई-टेंडरिंग, ई-परचेस अशा अनेक बाबींसाठी एकत्रित पद्धतीने वैशिष्टपूर्ण एक ॲप बनविण्याचे ठरले असून तशा सॉफ्टवेअर कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या मोबाईल ॲपमुळे कारभार पारदर्शक होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. लूज मिल्क डिलिव्हरी ही संकल्पना राबवून ग्राहकांना दुध घरपोच मिळणार आहे. दिल्ली येथे मदर डेअरी आहे. त्या पद्धतीने सोलापूर शहरात मदर डेअरी चालू केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये दूध पंढरीचे सर्व प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली जाणार आहे.
दूध संघाचा कारभार काटकसरीने व पारदर्शकपणे कसा चालविला जाईल अशा विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करून सर्व खातेप्रमुख व एमडी यांना आदेश व सूचना दिल्या. या बैठकीला संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, संचालक शंभूराजे मोरे, संचालक मनोज गरड, सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी कुंभोजकर, लटके साहेब, संघाचे कार्यकारी संचालक बंडगर साहेब तसेच सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments