अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने दहशतवादाची होळी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने दहशतवादाची होळी करण्यात आली.
भारतीय सांस्कृतिक परंपरेत सणाला व महत्त्व आहे आणि वैज्ञानिक महत्व सुध्दा आहे.
होळीचे दहण करुन सर्व लोक मनोमनी प्रार्थना करतात की या होळी मध्ये चुकीच्या गोष्टी भस्मसात करून पृथ्वीवर सर्व दुर आनंद पसरावे ही प्रार्थना करतात.
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने दहशतवादाच्या होळीत भ्रष्टाचार, आतंकवाद, गुन्हेगारी, बाल अत्याचार, लैंगिक अत्याचार, स्त्री भृणहत्या, स्त्री अत्याचार अशा अनेक समाज विघातक गोष्टीचे दहन करुन होळी करण्यात आली.
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने गेली सात वर्षे होळी साजरी करण्यात आली.
यंदाच्या वर्षीची होळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या वतीने होळी प्रज्वलित करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते, मल्लीनाथ स्वामी, नरेश मुन्नुरेड्डी, महेश कासट, गणेश येळमेली, भारत गवते ,अरूण निंबाळकर, श्रीकांत बच्चल, मल्लीनाथ बोळकवठेकर, चंदु नायकोडी, विनोद कर्पेकर आदीच्या उपस्थितीत होळी साजरी करण्यात आली.
0 Comments